सहकार व कृषी विकास कार्यक्रम

sonsodhon-prashikshanदेशाच्या आर्थिक विकासामध्ये सहकार क्षेत्राची भूमिका महत्वपूर्ण असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच भरीव असे कार्य करून देशाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सहकार क्षेत्रानेच देशाला एक नवी दिशा प्रदान केली आहे. याच सहकार क्षेत्राने पारदर्शकता व आपुलकीची भावना जनमानसात निर्माण केलेली आहे ही कौतुकाची बाब आहे. मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात ही पारदर्शकता टिकून राहाण्यासाठी तसेच काळाच्या गतीबरोबर तंत्रज्ञान अंगिकारण्यासाठी सहकार व कृषी क्षेत्रात संशोधन व प्रभावी प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. कारण प्रभावी प्रशिक्षणाद्वारे कर्मचार्‍यांचे कौशल्य विकसित होतात व पर्यायाने संस्थेचे हित साधले जाते. म्हणूनच सहकार व कृषी विभागात संशोधनात्मक दर्जेदार प्रशिक्षण आयोजित करणे हे संस्थेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

बँकींग प्रशिक्षण

संस्था सहकारी बँकींग क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी यांसाठी विविध विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करित असते. संस्थेने केवळ बँकींगच नव्हे तर कर्मचा-यांच्या व्यक्तिगत विकासावर देखिल लक्ष केंद्रित केले असून व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणावर भर दिला आहे. सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या काळात स्पर्धेशी दैनंदिन कामकाजात अधिक सुसूत्रता यावी व सक्षमता यावी यासाठी सह्कार वर्धिनी, पुणे यांचे सहकार्याने ‘केवायसी, ए एल एम, अॅण्ड अकाउंट ओपनिंग न्यु गाईडलाईन्स, सेटलमेंट ऑफ नॉमिनेशन अॅण्ड डिसेस क्लेम्स, एन आय अॅक्ट कलेक्टींग अॅण्ड पेयिंग बँकींग ऑब्लेगेशन, कस्टमर सर्व्हीस’ या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले. सदर कार्यशाळा संस्थेच्या सभागृहात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 यावेळात 2 सत्रात पार पडली. या कार्यशाळेत तज्ञ प्रशिक्षक मा. महेंद्र कोरडे व गिरीश जहागीरदार यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस एकुण 50 कर्मचारी व परिसरातील नागरिक हजर होते.

शेती आणि शेतकऱ्यांना सहाय्यभूत होणाऱ्या जागतिक संधी’ या विषयावर व्याख्यान, मार्गदर्शक

विनायकदादा पाटील
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीतून व दूरदृष्टीतून विकासाची गंगा आणली. हरितक्रांतीचा ध्यास घेऊन प्रत्यक्षात आणण्यातही ते यशस्वी ठरले. जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्‍नांची जाण आणि ते सोडविण्यासाठी असलेली तळमळ यामुळेच त्यांचे कार्य समाजासाठी आदर्शवाद व प्रेरणादायी आहे, त्याची जोपासना सर्वांनी करावी, असे प्रतिपादन विनायकदादा पाटील यांनी केले. वसंतराव नाईक यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद’ उपक्रमातंर्गत कार्यक्रमात बोलत होते. कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह, निफाड येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. ते पुढे म्हणाले की, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून शेती उत्पादनात वाढ करावी असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या सहवासातील आठवणी कथन केल्या.

राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या संयोजनामध्ये सक्रीय सहभाग

‘दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन’ मर्यादित नाशिक यांनी नाशिक येथे दि. 22 व 23 जानेवारी 2011 रोजी राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन केले होते. यात संस्थेने सक्रीय सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातील सहकार चळवळीला 105 वर्षे पूर्ण झाली असून राज्यात एकूण 551 नागरी सहकारी बँका आहेत. सहकार क्षेत्रातील बँकांनी आपल्या कार्यक्षेत्रात भरपूर वाढ केली असून आपल्या ग्राहकांना अद्यावत संगणकीकृत सुविधा पुरवित आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना जलद व सुलभ सेवा देण्यासाठी कोअर बँकिंग प्रणाली, ए.टी.एम. सेवा यासारख्या अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात सहकारी क्षेत्रातील बँका अग्रेसर आहेत. महाराष्ट्रातली नागरी सहकार बँकांची सद्यस्थिती आणि भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी नाशिक येथे राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ, स्वागताध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या सह मा. बबनराव पाचपुते, नामदार प्रकाश सोळंके, आ. हेमंत टकले, आ. वसंत गीते, आ. विनायक मेटे, मा. एकनाथ ठाकूर, आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

परिषदेच्या निमित्ताने अनेक ठराव करण्यात आले अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले. विचारांचे आदान-प्रदान झाले. राज्याच्या कानाकापोर्यातून एकमेकांना अपरिचित असलेले सहकार क्षेत्रातील मान्यवर सहकाराच्या झेंड्याखाली एकत्र आले. या परिषदेस महाराष्ट्र राज्यातील विविध भागांतील बँकांच्या 2209 प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. व परिषदेच्या मंचावरून आपल्या मांगण्या माडल्या तर काहींनी मुलाखती कक्षामधून मुलाखतीद्वारे आपल्या प्रश्नांना वाचा फोडली. कार्यक्रमस्थळी स्वागत कक्ष, मुलाखत कक्ष, भोजन कक्ष, नोंदणी कक्ष उभारण्यात आले होते. बँकिंग संदर्भात विविध माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते. ही सहकार परिषद उत्तम प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडली.

प्रशिक्षण

एकेकाळी स्थानिक गरजा भागविण्यासाठी स्थापन झालेल्या सहकारी बँका आज शहराच्या किंवा राज्याच्या सीमा ओलांडून दुसर्‍या राज्यात जाऊन पोहचल्या आहेत. न डगमगता स्पर्धेला सामोरे जाणार्या आणि उच्च तंत्रज्ञानाचा सहजपणे स्विकारणार्‍या या बँकांमुळे सहकार बँकींग क्षेत्रात खुपसा बदल झाला आहे. पर्यायाने ग्राहकांचा हाच बँकींग व्यवसायाचा मुलभुत आधार बनत आहे. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. पारंपारीक पध्दतीने सेवा, सुविधा उपलब्धतेच्या पध्दतींमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन अमुलाग्र बदल घडत आहेत. आजचा ग्राहकही या बाबत अत्यंत जागरुक आहे. यासाठी कर्मचारी हा प्रशिक्षित राहिला पाहिजे हिच काळाची गरज आहे. प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचे सुप्त गुण प्रकाशात येतात. पर्यायाने संस्थेला फायदाच होतो. यासाठी विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट या संस्थेने प्रशिक्षणाचे ध्येय निश्चितच केले आहे.

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com