रेडिओ विश्वास ९०.८ (समुदाय रेडिओ)

radio vishwas 90.8प्रसार माध्यमांमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. यासाठी ही प्रसारमाध्यमे समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजे व त्याद्वारे समुदायाच्या मूलभूत प्रश्‍नांवर बोलले गेले पाहिजे. समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय समोर ठेवून रेडिओ विश्वास 90.8- समुदाय रेडिओ कार्यरत आहे. समुदायाच्या विकासासंबंधी विविध कार्यक्रम निर्मिती व त्याचे प्रसारण तसेच या निर्मिती व प्रसारणामध्ये समुदायातील प्रतिनिधींचा मुख्य सहभाग ही समुदाय रेडिओची नाविन्यपूर्ण प्रक्रिया येथे कार्यरत आहे. रेडिओचे तंत्र शिकवून समुदायातील व्यक्तींचा आवाज बुलंद करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

सामाजिक विकासाचे प्रभावी माध्यम कम्युनिटी रेडिओ’ व्याख्यान

सामाजिक विकासाचे प्रभावी माध्यम कम्युनिटी रेडिओ’ या विषयावर एचपीटी महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व जनसंपर्क विभागात संस्थेने व्याख्यान आयोजित केले होते. यामध्ये विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे समन्वयक राजेश हिवरे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी समुदाय रेडिओविषयीची संकल्पना स्पष्ट केली. रेडिओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओ मार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यांमध्ये जाणीव सामाजिकतेची, स्वांत सुखाय, नाशिक रॉक्स, आजीच्या गोष्टी, पंचायत राज, घराभोवतालची बाग व लेडीज कट्टा या समुदायाच्या सहभागातून चालविलेल्या उपक्रमांची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच रेडिओ कार्यक्रम निर्मितीसाठी प्रस्तावाची आखणी कशी करावी याविषयी सादरीकरण केले. यात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, माहितीपट व लघुपट अशा विविध साधनांचा वापर केला. यावेळी राजेश हिवरे यांनी कोणतेही माध्यम वापरताना ते साधन म्हणून बघितले पाहिजे. तर साध्य म्हणून आपण देत असलेला संदेश व त्यातून अपेक्षित बदल याकडे बघितले पाहिजे, असे केल्यास आपण माध्यमात न अडकता बदलाच्या प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करतो, ही काळजी माध्यमकर्मीने घेणे गरजेचे असते असे सागितले.

समुदाय रेडिओ कार्यशाळा

जाणीव सामाजिकतेची उपक्रमातर्गत संस्थेच्या सभागृहात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध स्कूल कम्युनिटीसाठी वेगवेगळ्या सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात मनपा शाळा क्र.56-मुले व मनपा शाळा क्र.67-मुली (फुले नगर, नाशिक), आनंद निकेतन (पाईपलाईन रोड, गंगापूर रोड, नाशिक), नूतन प्राथमिक विद्यालय (गरवारे, अंबड, नाशिक), दिशा उपक्रम (विश्वास लॉन्स, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक), पाच बंगला प्राथमिक शाळा (खांडरे मळा, नाशिकरोड) व मनपा शाळा क्र.7-मुली व मनपा शाळा क्र.29-मुले (मखमलाबाद नाका, नाशिक) या शाळा सहभागी झाल्या.

यावेळी रेडिओ जॉकी सोहम शहाणे यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शब्दोच्चार आणि समयसूचकता यांचे महत्त्व रेडिओ जॉकीसाठी किती उपयुक्त आहे हे त्यांनी विशद केले. या क्षेत्रात करिअरसाठी भरपूर संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. रेडिओ विश्वासच्या निवेदिका पूनम पाटील यांनी रेडिओचे ऑन एअर शेड्युलिंग, स्टुडिओची माहिती, रसिकांना आवडणारे कर्यक्रम व त्याचा प्रतिसाद याविषयी अनुभव कथन केले. रसिकांच्या प्रतिसादामुळे कार्यक्रमामध्ये कशी विविधता आणता येते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. रेडिओ विश्वासचे समन्वयक राजेश हिवरे म्हणाले की, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांना आपले प्रश्न व नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी पर्यायी व हक्काचे व्यासपीठ म्हणून रेडिओ विश्वासने पुढाकार घेतला आहे त्या माध्यमातून संस्थांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. तरी यात जास्तीत जास्त संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

समुदाय रेडिओ एक प्रभावी माध्यम’ विषयावर परीसंवाद मविप्र संस्थेचे समाजकार्य महाविद्यालयात संपन्न

‘समुदाय रेडिओ एक प्रभावी माध्यम’ या विषयावर मविप्र संस्थेचे समाजकार्य महाविद्यालय नाशिक या ठिकाणी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यांमध्ये विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटच्या विश्वस्त दिपाली मानकर व रेडिओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओचे समन्वयक राजेश हिवरे प्रमुख व्याख्याते म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख होते. तसेच प्राध्यापिका चंद्रप्रभा निकम उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रम हा समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. परीसंवादामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना दिपाली मानकर यांनी समुदाय रेडिओ विषयीची संकल्पना स्पष्ट केली. यावेळी त्या म्हणाल्या समुदाय रेडिओ म्हणजे समुदायाच्या सहभागातून समुदायासाठी चालविला जाणारा रेडिओ होय. यात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील सहभागी होऊन त्यांचे अनुभव, निरीक्षणे व सामाजिक संस्थांविषयीचा दृष्टीकोन आणि अभ्यास हा कार्यक्रमाच्या माध्यमातुन व्यक्त करु शकतो. परीसंवादाच्या पुढील सत्रात राजेश हिवरे यांनी रेडिओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओ मार्फत चालविल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. यांमध्ये जाणीव सामाजिकतेची, स्वांत सुखाय, नशिक रॉक्स, आजीच्या गोष्टी, पंचायत राज, घराभोवतालची बाग व लेडीज कट्टा या समुदायाच्या सहभागातुन चालविलेल्या उपक्रमांची ओळख उपस्थितांना करुन दिली. तसेच रेडिओ कार्यक्रम निर्मीतीसाठी प्रस्तावाची आखणी कशी करावी याविषयी सादरीकरण केले. यात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, माहितीपट व लघुपट अशा विविध साधनांचा वापर करुन सदर परीसंवाद खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी राजेश हिवरे यांनी ‘‘कोणतेही माध्यम वापरतांना ते साधन म्हणून बघीतले पाहीजे. तर साध्य म्हणून आपण देत असलेला संदेश व त्यातुन अपेक्षीत बदल याकडे बघीतले पाहीजे, असे केल्यास आपण माध्यमात न अडकता बदलाच्या प्रक्रीयावर अधिक लक्ष केंद्रीत करतो, हि काळजी माध्यमकर्मीने घेणे गरजेचे असते.’’ समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समुदाय रेडिओच्या माध्यमातुन रोजगाराच्या संधींचा शोध घ्यावा व आपल्या सामाजिक कारकिर्दीला सुरुवात करावी असे आवाहन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट मार्फत करण्यात आले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले.

साऊंड एडिटिंग कार्यशाळा (दि.22 ते 24 मे 2015)

आजच्या स्पर्धेच्या काळात सतत तणावाखाली असल्याने आपले स्वतःचे छंद, आवड जोपासणे जनसामान्यांना दिवसेंदिवस अशक्य होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक अशा साऊंड एडिटिंग या विषयात आवड असणार्‍यांना ‘साऊंड एडिटर’ बनण्याची व प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ‘साऊंड एडिटिंग’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. सदर प्रशिक्षण नाशिक येथे दि.22 ते 24 मे 2015 या कालावधीत संपन्न झाले. ‘साऊंड एडिटिंग’ प्रशिक्षणात रेडिओ कार्यक्रमाचे निर्मिती संदर्भात साऊंड एडिटिंग संकल्पना समजावून घेणे, साऊंड एडिटिंग कौशल्यांचा अभ्यास करणे, रेडिओ कार्यक्रमांचे प्रोमो तयार करणे, साऊंड एडिटिंग सॉफ्टवेअरची ओळख व प्रात्यक्षिक, सृजनशील साउंड एडिटिंग कसे करावे हे शिकविण्यात आले व कार्यशाळेदरम्यान रेडिओ विश्वास 90.8 ला भेट देऊन चिकित्त्सक अभ्यास करण्यात आला.

रेडिओ जॉकी कार्यशाळा (दि.29 ते 31 मे 2015)

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेडिओ जॉकी’ कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळा क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेच्या समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड नाशिक येथे दि.29 ते 31 मे 2015 या कालावधीत पार पडली. सदर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक राजेश हिवरे व रेडिओ विश्वास येथील रेडिओ जॉकी धनश्री धारणकर व सोहम शहाणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये रेडिओ जॉकी संकल्पना समजून घेणे, रेडिओ जॉकी व निवेदक यातील फरक, इन्फोटेनरची भूमिका, रेडिओ जॉकीसंदर्भातील विविध कौशल्यांचा अभ्यास करणे, सृजनशील रेडिओ जॉकी म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रात्यक्षिकांद्वारे स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा व व्हाईस मॉड्युलेशन आदी विषयांवर मान्यवरांनी सत्रे घेतली. प्रशिक्षणादरम्यान रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ येथे भेट देऊन प्रशिक्षणार्थींकडून सराव करवून घेण्यात आला. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीला व्यक्तिगत फिडबॅक देण्यात आला.

रेडिओ जॉकी कार्यशाळा (दि.18 ते 20 डिसेंबर 2015)

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेडिओ जॉकी’ कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळा क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेच्या समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दि.18 ते 20 डिसेंबर 2015 या कालावधीत पार पडली. सदर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक राजेश हिवरे व रेडिओ जॉकी कृपानंद जाधव व सोहम शहाणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये रेडिओ जॉकी व निवेदक यातील फरक, इन्फोटेनरची भूमिका, रेडिओ जॉकी संदर्भातील विविध कौशल्यांचा अभ्यास करणे, सृजनशील रेडिओ जॉकी म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रात्यक्षिकांद्वारे स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा व व्हाईस मॉड्युलेशन आदी विषयांवर मान्यवरांनी सत्रे घेतली. शिक्षणादरम्यान रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ येथे भेट देऊन प्रशिक्षणार्थींकडून सराव करवून घेण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी रेडिओ जॉकी कार्यशाळा (दि.25 ते 27 मार्च 2016)

वर्षभर शालेय वातावरणामुळे स्वतःचे छंद व आवड याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना या उन्हाळी सुट्यांमध्ये ‘रेडिओ जॉकी’ प्रशिक्षणाची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली. दि.25 ते 27 मार्च 2016 या कालावधीत ‘रेडिओ जॉकी कार्यशाळा’ सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात संपन्न झाली. रेडिओ जॉकी संदर्भातील विविध कौशल्यांचा अभ्यास करणे, रेडिओ जॉकी म्हणून आवश्यक आवाजाचे चढ-उतार व गती यांचा सखोल अभ्यास करणे, सृजनशील रेडिओ जॉकी म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रात्यक्षिकांद्वारे स्वतःचा आत्मविश्वास वाढविणे यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान रेडिओ विश्वास 90.8 ला भेट देऊन विद्यार्थ्यांनी चिकित्सक अभ्यास केला. शिकण्याची आवड असणारे वय वर्षे 10 ते 18 च्या पुढील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

कम्युनिटी रेडिओ विषयावर व्याख्यान

‘सामाजिक विकासाचे प्रभावी माध्यम कम्युनिटी रेडिओ’ या विषयावर के..व्ही.एन. नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उमराळे बुद्रुक येथे संस्थेने व्याख्यान आयोजित केले होते. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे समन्वयक राजेश हिवरे प्रमुख व्या‘याते म्हणून उपथित होते. यावेळी ते म्हणाले, समुदाय रेडिओ म्हणजे समुदायाच्या सहभागातून समुदायासाठी चालविला जाणारा रेडिओ होय. प्रसार माध्यमांमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. यासाठी ही प्रसारमाध्यमे समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजे व त्याद्वारे समुदायाच्या मूलभूत प्रश्‍नांवर बोलले गेले पाहिजे. समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ब्रीद घेऊन समुदाय विकासासंबंधी विविध कार्यक्रम निर्मिती व प्रसारणांमध्ये समुदायातील प्रतिनिधींचा मुख्य सहभाग ही कम्युनिटी रेडिओची नावीन्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यांनी समुदाय रेडिओ विषयीची संकल्पना स्पष्ट केली.

रेडीओ विश्वास 90.8 समुदाय रेडीओ

नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरातील समुदायांसाठी चालविला जाणारा रेडीओ. समाजाला सर्व प्रकारचे ज्ञान तसेच आवश्यक माहिती मिळावी यासाठी विविध विषयावर तज्ञाच्या मुलाखती, माहितीपर कार्यक्रम याद्वारे प्रसारित केले जातात. सर्व वयोगटांसाठी विविध कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. साधारण 10 ते 12 लाख लोकसंख्येचा परिसर या रेडीओ मार्फत कव्हर केला जातो.

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com