सामाजिक, सांस़्कृतिक व कला विकास

Samajik Saskrutik मूल्याधारित समाज निर्मितीसाठी सामाजिक, सांस्कृतिक व कला विकास या त्रिसूत्रीचे संवर्धन होणे महत्वाचे आहे. यासाठी नवनिर्माते पुढे येणे, त्यांचे कौतुक होणे व त्यांना प्रेरणा मिळणे तसेच ऐतिहासिक-सांस़्कृतिक कला व परंपरांचा वारसा टिकवून नव्या पिढीमध्ये त्याविषयी आवड व आस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच विविध स्तरांवर कला व सांस्कृतिक महोत्सव, परिसंवाद, चर्चासत्र व प्रदर्शनी या उपक्रमांद्वारे संस्था कला व कलावंतांची जोपासना करत आहे.

‘चित्रपट चावडी’

‘द ट्रॅव्हलींग प्लेअर्स’
शुक्रवार, दि. 21/04/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार 21 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध ग्रीस दिग्दर्शक थिओ अ‍ॅन्जेलोपुओलॉस यांचा ‘द ट्रॅव्हलींग प्लेअर्स’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

‘द ट्रॅव्हलींग प्लेअर्स’ या प्रदीर्घ चित्रपटामध्ये थिओ आधुनिक ग्रीसच्या इतिहासाचा पट फिरस्थ्या नट मंडळींच्या गटाच्या माध्यमातुन उलगडतो. हा चित्रपट 1939 मधील ग्रीसमध्ये सुरू होतो आणि दुसरे महायुद्ध व नंतर यादवीयुद्ध असा प्रवास करत 1952 पर्यंतचा कालखंड उभा करतो. ग्रीस प्रस्तुत कालखंडात कसा ढवळून निघाला होता ह्याचे अत्यंत तपशीलासह चित्रण यात आहे.

‘युलीसेसेस गेझ’

शुक्रवार, 05/05/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार 5 मे 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध ग्रीस दिग्दर्शक थिओ अॅन्जेलोपुओलॉस यांचा ‘युलीसेसेस गेझ’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

‘युलीसेसेस गेझ’ या चित्रपटामध्ये अमेरीकेत आश्रयाला गेलेला ग्रीक चित्रपट कृती, ग्रीसमध्ये एका वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी परत येतो. पण त्याचे परतण्याचे उद्दीष्ट वेगळेच असते. त्याला फार पुर्वीच्या एका फिल्म मेकरने चित्रांकित केलेल्या फिल्म रिळांचा शोध घ्यावयाचा असतो. पण नक्की काय साध्य करायचे आहे दिग्दर्शकाला, नेमका कशाचा वेध घ्यायचा आहे? काय आहे त्या हरवलेल्या रीळांमध्ये? हे या सिनेमामध्ये दाखविण्यात आले आहे.

दि चाईल्ड

शुक्रवार, दि. 19/05/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध बेल्जियम दिग्दर्शक जॉ पिएरे आणि ल्युक दार्दान यांचा ‘दि चाईल्ड’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

आपल्या वास्तववादी शैलीने आणि वैशिष्टपूर्ण छायाचित्रण पध्दतीने गोष्ट सांगणारे दिग्दर्शक द्वय युरोपमध्ये तसेच जगभर प्रसिध्द आहेत. दि चाईल्ड मध्ये ब्रुनो व सोनिया या तरुण प्रेमिकांची गोष्ट आहे. ब्रुनो हा रस्त्यावरचा भुरटा चोर आहे व या दोघांचे जीवन बेल्जियममधील सोशल वेल्फेअर योजनांवर अवलंबून आहे. अत्यंत उनाड आणि दिशाहीन जगणार्‍या या तरुण जोडप्याच्या आयुष्यात अपरिहार्यपणे मुलाचे आगमन होते. त्यातून काय नाट्य उभे राहते हेच या सिनेमात दाखविण्यात आले आहे.

मा. खा. शरद पवार यांची जाहीर मुलाखत

रविवार, दि. 28/05/2017

शेतकरी हा खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाचा कणा आहे. त्याला आधार दिला तरच विकासाच्या दृष्टीने देश पाऊल टाकेल, आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील बळीराजा संकटात सापडला आहे. विविध संकटांमुळे त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा हतबल शेतकर्‍याला शासनाने आधार देण्याची गरज असून, कर्जमाफी द्यावी, अथवा शेतमालाला किंमत तरी मिळवून द्यावी, असे सांगत शेतकरी हितासाठी संघर्ष करण्यासाठी मला रस्त्यावर उतरावे लागले, तरी चालेल असा निर्धार राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे भूमिपुत्र देशाचे माजी कृषी व संरक्षण मंत्री, राज्याचे मा. मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. खा. शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव, कायदेमंडळातील पाच दशकांच्या कार्याचा वेध घेणार्‍या संस्मरणीय मुलाखतीचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते.

सुप्रसिद्ध लेखक अंबरीश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ यांनी मा. शरद पवार यांची मुलाखत घेतली.

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा

मार्गदर्शक : डॉ. जब्बार पटेल, समर नखाते
रविवार, दि.04/06/2017

सिनेमा ही कला समाजातल्या वास्तवाचे प्रतिबिंब असून आशयाबरोबरच परंपरेच प्रतिबिंब त्यात पडलेलं असतं. काळ आणि अवकाश यांचा अनन्य साधारण संबंध त्यात पुरातन आहे. काळाची सलगता आणि कथन व्यवस्थेचं अनोखे मिश्रण त्यात आहे. असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपटतज्ज्ञ समर नखाते यांनी केले.

यशववंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, एम.आय.टी. स्कूल फिल्म अँड, टेलिव्हीजन पुणे फिल्म फाऊंडेशन, सारस्वत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट रसग्रहण कार्यशाळेत’ मार्गदर्शन करतांना केले. समर नखाते म्हणाले की, बदलत्या काळानुसार सिनेमाची भाषा तयार झाली असून नवनवीन विषय घेऊन चित्रपट समृद्ध होत आहेत. समाजाच्या संवेदना बोथट न होण्यासाठी कलाकृती ही नवा विचार देत असते. व्यापक मानवी भान आणि वैश्‍विक सत्य मांडणे हे अस्सल सिनेमाचे लक्षण आहे. भारतीय आणि जागतिक सिनेमात याचं दर्शन झालेलं आहे. नव्या पिढीबरोबर सिनेमाची भाषा बदलत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सिनेमातील विविध प्रसंग दाखवले.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, समाज आज सिनेमा आस्वादाची, अभिरूचीची नवी जाणीव घेऊन दिशादर्शक म्हणून काम करत आहे. परंपरेत असलेलं अभिजात साहित्य नव्या अविष्कारातून समोर येत आहे. सिनेमाची नवी परिभाषा निर्माण होत असून काळाची स्पंदने अभिव्यक्त होत आहेत. नव्या लेखक दिग्दर्शकांसमोर निर्मितीचे आव्हान आहे आणि उच्च कलामूल्य असलेली निर्मिती करावी असे आवाहनही डॉ. जब्बार पटेल यांनी केले.

कार्यक्रमांचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे विनायक रानडे यांनी केले व डॉ. जब्बार पटेल यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी व समर नखाते यांचा सन्मान शाम लोंढे यांनी केला. कार्यशाळेस दोनशेहून अधिक शिबीरार्थी उपस्थित होते.

दि प्रॉमिस

शुक्रवार, दि. 9/06/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक जॉ पिएरे आणि ल्युक दार्दान यांचा ‘दि प्रॉमिस’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

‘दि प्रॉमिस’ मध्ये इगॉर ह्या पंधरा वर्षीय तरूणाची कथा आहे. त्याचे वडील बेल्जीयममध्ये अवैध मार्गाने प्रवेश करणार्‍या परदेशस्थांना मदत करतात. अर्थातच हा त्यांचा व्यवसाय धोकादायक व अनैतिक आहे. अमिडु हा परदेशस्त आफ्रिकन अपघातात मरतो. पण त्याच्या बायकोला असोताला त्याची कल्पना नसते. त्या घटनांचा विलक्षण चक्राऊन टाकणारा शोध या चित्रपटात आहे.

‘टू डेज वन नाईट’

शुक्रवार, दि. 16/06/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक जॉ पिएरे आणि ल्युक दार्दान यांचा ‘टू डेज वन नाईट’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

‘टू डेज वन नाईट’ मध्ये बेल्जीयम मधील एका शहरात सँन्ड्रा एका कारखान्यात काम करत असते. कारखान्याच्या व्यवस्थापनाने विभागातील एका कर्मचार्‍याला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात इतरांना काही बोनस देण्याचेही ठरविले. योगायोगाने सँड्रावर त्या निर्णयात नोकरी जाण्याची वेळ येते. तिच्याकडे आता फक्त दोन दिवस व एक रात्र आहे. सँन्ड्रा त्या काळात आपली नोकरी टिकविण्यासाठी काय करते ते या चित्रपटात दाखविले आहे. दार्दान बंधु जनसामान्यांच्या अपरीहार्य घटनांवर आधारीत चित्रपट बनवितात व त्यातील पेच प्रसंग ते मार्मिकपणे खुलवितात.

‘माय नाईट अॅट मॉड’

शुक्रवार, दि. 7/07/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘माय नाईट अॅट मॉड’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

‘माय नाईट अॅट मॉड’ सिनेमाच्या लाटेमधील एरिक रोहमर अपरिचित पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहे. चाळीसहून अधिक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. खास फ्रेंच ठसा असलेला एरिकचा सिनेमा म्हणजे थेट सरळ, सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सहज घटना टिपणारा त्यातून आपल्याला सौंदर्यदृष्टी, नातेसंबंधाची जाणीव सहजपणे जाणवते.

एरीकने दिग्दर्शित केलेल्या सहा नितीकथांच्या मालिकेतील ही तिसरी कथा यात घटस्फोटीत एका डॉक्टरची व एका मध्यमवयीन तरूणीची भेटीची गोष्ट आहे. त्यात तत्वज्ञान, धर्म आहे. राजकारण व नीतीमत्तेच्या संकल्पनांची चर्चा आहे. जीवनातील मूल्यांचा शोध आहे

‘अ समर्स टेल’

शुक्रवार, दि. 21/07/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘अ समर्स टेल’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

‘अ समर्स टेल’ सिनेमाच्या लाटेमधील एरिक रोहमर अपरिचित पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहे. चाळीसहून अधिक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. विविध ऋतुंवर आधारित कथानकांच्या मालिकेतील एरिक रोहमर यांची ‘अ समर्स टेल’ ही नर्मविनोदी प्रेमकथा आहे. तरूण गणिताचा विद्यार्थी पण गिटार वादनाचा शौक असलेल्या गॅस्पार्ड व त्याची मैत्रिण लेना यांच्या सुट्टीमध्येˆस्पेनमधील भेटीची पण भेटीच्या दरम्यान त्याची आणखी दोन स्त्रियांशी गाठ पडते. गॅस्पार्ड आता तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या भेटीमुळे गोंधळात पडला आहे.

‘मार्कोसे ऑफ ओ’

शुक्रवार, दि. 4/08/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘मार्कोसे ऑफ ओ’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

‘मार्कोसे ऑफ ओ’ सिनेमाच्या लाटेमधील एरिक रोहमर अपरिचित पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहे. अठराव्या शतकात उत्तर इटलीमध्ये घडणारे हे कथानक ‘मार्कोसे ऑफ ओ’ एका तरूण, सुशील व सुंदर विधवा तरूणीची गोष्ट सांगते. त्या छोट्या लष्करी छावणीवजा शहरामध्ये रशियन सेनेचा हल्ला होतो. ‘मार्कोसे ऑफ ओ’ वर बलात्काराचा प्रसंग ओढवतो व त्यातुन ‘ओे’ला एक उमदा तरूण रशियन सैन्याधिकारी वाचवतो. काही काळानंतर ‘ओ’ला ती गरोदर असल्याची जाणीव होते आणि तिच्या पोटात वाढणार्‍या गर्भातील पित्याचा शोध सुरू होतो.

‘डियर डायरी’

शुक्रवार, दि. 18/08/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘डियर डायरी’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतला हा पहिला चित्रपट आहे. साधारण 40 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण चित्रपट केले आहेत आणि भूमिकाही केल्या आहेत. मानवी नात्यामधील गुंतागुंत व आत्मशोधाच्या वाटेवर येणार्‍या अनेक अनुभवांचा वेध मोरेट्टी यांनी आपल्या चित्रपटातून मांडला आहे. चित्रपटांच्या विषयांच्या शोधात असलेला एक दिग्दर्शक म्हणजेच त्यांचा स्वत:चा प्रवास यातून मांडला आहे.

मदन मोहन यांना स्वरवंदना

‘है तेरे साथ मेरी वफा’
शनिवार, दि. 19/08/2017

जगण्यातल्या आनंदी क्षणांची हळुवार जाणीव असो किंवा दु:खभरल्या वेदनांची अनवट दास्तान असो. या सर्व परस्परविरोधी अनुभवांचा वेध संगीतकार मदन मोहन यांनी आपल्या संगीत रचनातून घेतला. तीच अवीट गोडीची अनुभूती पुन्हा एकदा नाशिककर रसिकांना आली. सोबतीला ख्यातनाम लेखक अंबरीश मिश्र यांचे गाण्याइतकेच मधुर निवेदन रसिकांना मदनमोहन यांच्या सुमधुर आठवणीत घेऊन गेले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, संकलेचा कन्स्ट्रक्शन, नाशिक, जुम्मा मशिद चॅरीटेबल ट्रस्ट, विश्वास लॉन्स व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपट संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने रसिकांना अवीट व मधुर गाणी देणारे संगीतकार मदन मोहन यांचे स्मरण म्हणून ‘है तेरे साथ मेरी वफा’ मैफलीचे विश्वास लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर, मिलींद धटींगण व विवेक केळकर ही गाणी सादर केली. कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन सुप्रसिद्ध लेखक व संगीत अभ्यासक अंबरीश मिश्र यांनी केले. मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या गाण्यांच्या आठवणी वाद्यरचनेचा अभिनव वापर याविषयी अंबरीश मिश्र अभ्यासपूर्ण आणि सहज निवेदनात उलगडून दाखविल्या. मैफीलीची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.

‘द सन्स रूम’

शनिवार, दि. 2/09/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘द सन्स रूम’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या अत्यंत गाजलेला व सोळा आंतरराष्ट्रीय पारीतोषीकांनी गौरवलेला यशस्वी चित्रपट आहे. एक इटलीतील मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब अचानक घडलेल्या अपघाताने कोलमडून पडते. मानसशास्त्रीय सल्लागार असलेल्या कुटुंब प्रमुखावर सावरण्याची जबाबदारी येते. दु:खद आठवणींच्या गर्तेतून बाहेर पडण्याची धडपड करणार्‍या कुटुंबाची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

वुई हॅव अ पोप

शनिवार, दि. 16/09/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘वुई हॅव अ पोप’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या चित्रपट मालीकेतील हा प्रसिद्ध चित्रपट आहे. व्हॅटीकन सिटी, ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च पदी असलेले धर्मगुरू पोप. पोपच्या निवडीमागचे राजकारण, पोपच्या भरजरी कपड्यामागे दडलेला सामान्य माणुस असे अनेक पैलु उलगडणारा हा चित्रपट ट्रॅजिकॉमीक आहे. नेहमीप्रमाणे चित्रपट दिग्दर्शक खास भुमिकेत इथेही हजर आहेत. 2011 मध्ये इटली येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 100 मिनीटांचा आहे.

‘फिल्म उत्सव’

रविवार, दि. 24/09/2017

भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म समजले जाते. विंदा करंदीकरांनी त्यांच्या एका लघुनिबंधात आंब्याचा आस्वाद कसा घ्यावा याचे सुरेख वर्णन केले आहे. तो खरतरं फक्त जिव्हेचा अनुभव नसुन पंचेद्रियांचा आहे. अन्न, स्वयंपाक त्याचे सेवन हे जगभरच्या विविधतेतील एक महत्त्वाचे तत्व आहे. साहजिकच चित्रपट जगतात हे सुत्र घेऊन अनेक चित्रपट झाले आहेत. हा विचार घेऊन अन्न ह्या सुत्राभोवती गुंफलेल्या चार चित्रपटांचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हे चित्रपट समकालीन असून स्वीडन, जपान, अमेरीका अशा विविध देशातील आहेत. खालील अभिनव चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना अनुभवास मिळाली.

बॅबेट्स फिस्ट : ही कथा आहे एकोणीसाव्या शतकातील डेन्मार्कमधील दोन प्रौढ अविवाहित बहिणींची. त्या चर्चचे काम करणार्‍या अतिशय कर्मकठोर बापाच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रार्थना सभा व समाजकार्य आयोजित करतात. त्यांची भेट एका बॅबेट नावाची फ्रेंच स्त्रीशी होते. ही गूढ व्यक्तीमत्त्वाची बाई त्या बहीणींच्या घरी राहून स्वयंपाकाचे काम करते. एकदा ती गावकर्‍यांसाठी मेजवानीचे आयोजन करते. अनेक वर्षांच्या अतृप्त मनोकामनांचे प्रतिक ठरलेली बॅबेटची मेजवानी बहिणींची आयुष्यात एक वेगळीच तृप्ती व समाधानाची भावना घेऊन येते.

स्वीट बीन : चित्रपट व अन्नाचा संबंध व्यामिश्र आहे. सुचकता, वासना, परस्परसंबंध तसेच जुन्या आणि नव्या प्रथांमधील दुवा अशा अनेक गोष्टींचा उहापोह त्यामधून होतो. ‘स्वीट बीन’ ह्या जपानी चित्रपटात परंपरागत व नविन प्रथांमधील जाणिवांचा अतिशय सुरेख गोफ आहे. गोष्ट तशी साधी सरळ पण नितांत सुंदर अशी चित्रीत केलेली आहे. पारंपारिक पाककृतीतून दोन पिढीतील हलकेसे नाट्य अधोरेखित करणारा स्वीट बीन हा खरोखरच गोड अनुभव आहे.

ज्युली अँड जुलीया : 2009 ज्युली आणि जुलीया ह्या दोन एकमेकांना कधीही न भेटलेल्या स्त्रियांची सत्यकथा आहे. ज्युली चाईल्ड हिने फ्रेंच पाककृती अमेरीकेत प्रथम पोहचविल्या त्या चाळीसच्या दशकात. तर ज्युली पॉवेल ही एकविसाव्या शतकातील नेाकरी करणारी तरूणी आहे. ज्युलीया चाईल्डचे फ्रेंच पाककृतींवरचे पुस्तक हा दोघींमधला दुवा आहे. दोघींचे स्वयंपाक संस्कृतीवरचे प्रेम आणि त्यांच्या वैयक्तीक जीवनावरील त्याचा प्रभाव ह्या दोनही गोष्टी लक्षणीय आहेत. ह्या दोघींचा प्रवास वेगळ्या कालखंडात होऊनसुद्धा किती जवळच्या आहे हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.

लंच बॉक्स : रितेश बात्रा यांचा ‘लंच बॉक्स’ अनवधानाने जोडल्या गेलेल्या दोन अपरीचित व्यक्तीमधला पट आहे. त्याला मुंबई महानगराची व त्यातील गुंतागुंतीच्या व्यवस्थांची पार्श्वभूमी आहे. अन्न हे खरोखरच परब्रह्म आहे याची प्रचिती देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यांचा पोटाचा व संवेदनांचा ताबा घेतो.

लघुपट निर्मिती कार्यशाळा

मार्गदर्शक – अशोक राणे (चित्रपट, समीक्षक, लेखक)
बुधवार, दि. 27/09/2017

लघुपट निर्मिती करतांना व त्यामध्ये गतीमानता येण्यासाठी रोजच्या जगण्यातील गोष्टीला प्राधान्य देण्याबरोबरच वर्तमानातील सहज साध्या भाषेचा वापर करावा. घडणाऱ्या घटनेकडे कृती म्हणून बघावे. तसेच कथेचे बीज हे दर्जेदार आणि अविष्कारासाठी पुरेपूर शक्यता असणारे हवे. दृश्यमाध्यम असले तरी शब्दांचा नेमका वापर करण्याचे कौशल्य दिग्दर्शकाकडे असावे. त्यातून कलात्मक आणि उत्तम लघुपट समोर येतो. असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट समीक्षक, लेखक, अशोक राणे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लघुपट निर्मिती कार्यशाळे’चे आयोजन विश्वास क्लब हाऊस येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘लघुपट निर्मिती करतांना दिग्दर्शकाने आपल्यातील दृश्यमाध्यमाच्या शक्यता तपासाव्यात आणि त्यातून मला काहीतरी आणि नेमके सांगायचे आहे. याची जाणीव अधोरेखित करावी. सिनेमाची एक भाषा असते आणि त्याचा वापर करण्याची शैली विकसित करावी. दृश्यातील व्यक्तीमत्त्वाच्या कंगोर्‍यातून खूप काही व्यक्त होत असते त्याचा पुरेपूर वापर करावा.’ यावेळी श्री. राणे यांनी भारतीय व जागतिक सिनेमाचे वेगळेपण, पटकथा, कॅमेरा आणि कथा मांडण्याची तांत्रिक शैली यांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत आणि ते फिल्मिन्गो इंटरनॅशनल लघुपट महोत्सवात जगप्रसिद्ध कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या व्यासपीठावरून जगभर जावेत, हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख हेतू होता. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना दिग्दर्शक शिव कदम म्हणाले की, दिग्दर्शकाने पात्राच्या भूमिकेनुसार कथेची मांडणी करावी. पात्राचा प्रवास का कसा होतो? पात्राच्या भूमिकेनुसार लघुपटातील कथेत जिवंतपणा निर्माण करणे, सरळ-साधी गोष्टी सांगण्याची पद्धत यात वेगळेपण असायला हवे. उत्तम चित्रपट निर्मितीसाठी सर्व कलांचा व्यासंग आणि जाण असणे महत्त्वाचे आहे. संगीत चित्रकला यांची जाण दृश्य माध्यमाला पूरकच आहे असेही श्री. कदम म्हणाले.

प्रास्ताविक व स्वागत करतांना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, नाशिकमधील अनेक कलावंत लघुपट, चित्रपट क्षेत्रात जगभर नाव कमवत आहेत. त्यांना अशा कार्यशाळांमधून मार्गदर्शन, व्यासपीठ मिळण्यास निश्‍चितच मदत होईल. सिनेमा, लघुपटातून अनेक विषय प्रभावीपणे तरूण दिग्दर्शक मांडत आहेत. हे चित्रपटसृष्टीला बळ देणारे आहे. कार्यशाळेत लघुपट म्हणजे काय? पटकथा लेखन, छायाचित्रण आणि संकलन, लघुपट निर्मितीची इतर अंगे, लघुपट त्यांचे आणि आपले आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शंभरहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण काळे यांनी केले.

‘आय एम गोइंग होम’

शनिवार, दि. 07/10/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘आय एम गोइंग होम’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

गिल्बर्ट वॅलन्स हा पॅरीसच्या रंगभुमीवरील सुप्रसिद्ध नट उतरणीच्या वयात आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. अचानक कोसळलेल्या संकटांमुळे गिल्बर्टला फक्त नातवाचा आधार उरतो. त्याची करूण कहाणी दाखविण्यात आलेली आहे.

पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक मन्युअल डी. ऑलीवेरा हे जागतिक चित्रपट सृष्टीतील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. 106 वर्षांचे प्रदिर्घ आयुष्य लाभलेले ऑलीवेरा 80 वर्षे चित्रपट सृष्टीत कार्यरत राहीले. मूक चित्रपट ते 21वे शतक असा खूप मोठा कालखंड त्यांनी पाहिला. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता तशी उशीराच मिळाली. पण पोर्तुगालमधील हुकुमशाही राजवटीमुळे सुरूवातीला चित्रपटासाठी लागणारे पोषक वातावरण नव्हते. एकंदरीत सामाजिक आशयाचा चित्रपट तसेच लघुपट व माहितीपटांची अखंड निर्मिती केली. 2001 मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 90 मिनीटांचा आहे.

आरोग्य विषयक व्याख्यान

डॉ. भालचंद्र कुलकर्णी
शनिवार, दि. 07/10/2017

रोजच्या जीवनातील तणाव, व्यस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव, बैठे काम, पाणी कमी पिणे यातून अनेक व्याधी सुरू होतात. त्यातलाच मुळव्याध हा एक आजार आहे. त्यावर उपाय म्हणजे आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करणे उत्तम आहे असे प्रतिपादन डॉ. भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भालचंद्र कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की ‘पालेभाज्या, सलाड, कोशिंबीर, गाजर, मुळा, कोबी यांचा तसेच फळे, सफरचंद, चिकू, अननस, डाळींब, केळी यांचा रोजच्या जेवणात समावेश असावा. त्यामुळे फिशर, फिश्‍चुला यासारख्या आजारापासून संरक्षण होऊ शकते व आपण निरोगी राहू शकतो. याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी आनंदी मनासाठी व्यायाम करावा त्यातून आनंदी जीवनशैलीचा मार्ग सुकर होतो.’ वजन कमी करणारी औषधे, कोलेस्टेरॉल कमी करणार्‍या औषंधांपासून सावधगिरी बाळगण्याचेही त्यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक करतांना बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी धावपळीच्या जीवनशैलीत आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक नव-नवीन आजार निर्माण होत आहेत. त्यावर प्रबोधनात्मक जाणिवेतून अशा व्याख्यानांचे बँकेतर्फे आयोजन करण्यात येते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी कुलकर्णी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारीका देशपांडे तसेच विश्वास को-ऑप. बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

‘अनिकी बोबो’

शनिवार, दि. 28/10/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक मन्युअल डी. ऑलीवेरा यांचा ‘अनिकी बोबो’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

ऑलीव्हेरांचा हा अगदी सुरूवातीचा पोर्तुगीज चित्रपट पुढे येऊ घातलेल्या इटालीयन नव वास्तववादाची नांदीच होती. चित्रपटातील सर्व पात्रे खरंतर लहान मुलेच आहेत. पण त्यांचे बालखेळ मात्र मोठ्यांचे प्रतिबींबच आहेत. लहान मुलांचा निरागसपणा व खेळकरपणा मात्र शेवटी प्रेक्षकांची मने जिंकतो. पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक मन्युअल डी. ऑलीवेरा हे जागतिक चित्रपट सृष्टीतील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. 106 वर्षांचे प्रदिर्घ आयुष्य लाभलेले ऑलीवेरा 80 वर्षे चित्रपट सृष्टीत कार्यरत राहीले. मूक चित्रपट ते 21वे शतक असा खूप मोठा कालखंड त्यांनी पाहिला. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता तशी उशीराच मिळाली. पण पोर्तुगालमधील हुकुमशाही राजवटीमुळे सुरूवातीला चित्रपटासाठी लागणारे पोषक वातावरण नव्हते. एकंदरीत सामाजिक आशयाचा चित्रपट तसेच लघुपट व माहितीपटांची अखंड निर्मिती केली. 1942 मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 71 मिनीटांचा आहे.

‘द मॅन विदाउट पास्ट’

शनिवार, दि. 18/11/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत फिनलंडचे चित्रपट दिग्दर्शक अकी कैारिस्मकी यांचा ‘द मॅन विदाउट पास्ट’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

अकी कैारिस्मकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या-फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपुर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची प्रमुख पात्रे सर्वसामान्य फिनलंडर असतात. हा चित्रपट एका वेल्डरची गोष्ट आहे. काही चोरटे त्याच्यावर पार्कमध्ये हल्ला करतात. डोक्यावरील आघाताने मृत्यु व नंतर तात्पुरती विस्मृती आलेला चित्रपटाचा नायक जणू पुर्वजन्म घेऊन नवे आयुष्य शोधतो. त्यात गत आयुष्याचे खुणा सापडतात का? हे या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांनी जाणून घेतले. 2002 मध्ये फिनलंड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 97 मिनीटांचा आहे. सिनेमा पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

जीवनशैली आणी ह्रद्यरोगावर व्याख्यान

मार्गदर्शक : डॉ. मनोज चोपडा
शुक्रवार, दि.24/11/2017

आजच्या धावपळीच्या जगात जीवनशैलीत वेगाने बदल होत असून ताणतणावात देखील वाढ होत आहे. सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे नैराश्यदेखील वाढू लागले असून आनंदी व निरोगी जगण्यासाठी निसर्गाशी मैत्री करुन डॉक्टरांनी सांगिततलेल्या सूचनांचे पालन करणे हितावह राहील, असे मत ख्यातनाम ह्रद्यरोगतज्ञ डॉ.मनोज चोपडा यांनी केले.

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, सारस्वत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्ण्यात आलेल्या ‘ जीवनशैली आणी ह्रद्यरोग’ या व्याख्यानात मार्गदर्शन करतांना केले.

डॉ.चोपडा यांनी ग्लोबल वार्मिंग, वाढते ध्वनी प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण याचा जीवनशैलीवर परिणाम होत असून ऐन तारुण्यातच फ्रद्यरोग, रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार वाढू लागल्याचे सांगितले. असे आजार रोखण्यासाठी तेल, तूप, साखर, मैदा यांचे आहारातील प्रमाण कमी करावे तसेच योगसाधना करणे महत्वाचे आहे असेही आवर्जुन सांगितले.

कार्यक्रमांचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे डॉ.सुधीर संकलेचा यांनी केले व डॉ. मनोज चोपडा यांचा सन्मान नितीन ठाकरे यांनी केला.

‘क्राईम अॅण्ड पनिशमेंट’

शनिवार, दि. 02/12/2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत फिनलंडचे चित्रपट दिग्दर्शक अकी कैारिस्मकी यांचा ‘क्राईम अॅण्ड पनिशमेंट’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

जगप्रसिद्ध कादंबरीकार पॅदेर दस्तोवस्की यांच्या ‘क्राईम अॅण्ड पनिशमेंट’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचा नायक राईकायनेन हा एका खटिकखान्यात काम करीत असतो. तो अशा व्यक्तिचा खून करतो ज्या व्यक्तीने आपल्या गाडीने नायकाच्या बायकोला जखमी केलेले असते. त्याचवेळी खुनाच्या प्रसंगी नायकाची एका तरुण मुलीशी गाठ पडते. व पुढे होणारा चित्रपट रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. सन 1983 मध्ये फिनलंड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 93 मिनीटांचा आहे. सिनेमा पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

‘मोफत ग्रंथवाटप’

बुधवार, दि. 06/12/2017

सत्वशिल समाज निर्माण होण्यासाठी आध्यात्मिक वाचनाची गरज आहे. समाज सुसंस्कृत होण्यासाठी आपल्या संस्कृती व आध्यात्मिक परंपरेचा शोध घेण्यासाठी आध्यात्मिक पुस्तके, संत चरित्रांचे वाचन करणे गरजेचे आहे. आध्यात्मिक वाचनातूनच समाजमानाची विधायक जडणघडण होते. असे मत विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले.

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रविवार कारंजा मित्रमंडळ नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, सारस्वत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने चांदीचा गणपती नाशिक येथे धार्मिक पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.

मराठी, हिंदी धार्मिक परंपरेतील अनेक महत्वपुर्ण ग्रंथ, संदर्भग्रंथ व मासिकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

‘पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार’ व्याख्यान

मार्गदर्शक- विजय लिमये
रविवार, दि. 10/12/2017

देशभरात विविध कारणांनी वर्षभरात सरासरी एक कोटी नागरिकांचे निधन होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे दोन कोटी वृक्ष तोदले जात असून पर्यावरणाचा -हास होत आहे. शेतीत पीक निघाल्यानंतर उरणारा कचरा न जाळता त्यापासून गोव-या बनविण्याची ‘मोक्षकाष्ठ’ ही पद्धत या प्रश्‍नावर उपाय ठरु शकते. त्यामुळे अंत्यसंस्कारसाठी या पद्धतीला प्राधान्य द्यावे असे आवाहन नागपुरचे नैादलातील निवृत्त अधिकारी विजय लिमये यांनी केले.

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, सारस्वत बँक यांच्यातर्फे आयोजित ‘पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार’ या विषयावर ते बोलत होते.

श्री. लिमये यांनी मोक्षकाष्ठ कल्पना समजावून सांगितली. ते म्हणाले की, अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी लाकडे भारतीय वंशाच्या लाखो झांडांची कत्तल केली जाते. पर्यावरणाच्या हानीकडे मानवी दृष्टीकोनातून पाहावे. पीक निघाल्यावर उर्वरीत कचरा जाळला जातो. या कच-यापासून लाकडी विटा तयार करण्याची संकल्पना 2015 मध्ये सुरु केली. नागपुर महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी सदर पद्धत स्विकारली आहे. देशभर ही पद्धत स्विकारल्यास दोन कोटी वृक्षांचे प्रत्येक वर्षी संवर्धन होऊ शकेल. व्याख्यानास पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या सम्ख्येने उपस्थित होते.

विश्वास संकल्प आनदाचा उपक्रमांतर्गत

‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ संगीत मैफल
रविवार, दि.31 डिसेंबर 2017

‘घर आजा घिर आए बदरा सावरियां’, ‘ये शाम मस्तानी’, ‘ये क्या हुआ’ अशा एकाहून एक सरस गितातून आर.डी.बर्मन यांच्या सुरांच्या मोहिनीचा अनुभव विश्वास लॉन्सवर जमलेल्या हजारो नाशिककर रसिकांना आला. नविन वर्षाची सुरुवात आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हावी या संकल्पनेतून विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक, फ्रावशी इंटरनॅशनल अ‍ॅकडेमी, विश्वास लॉन्स, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपट संगीतात आपल्या जादुई संगीताने रसिकांना अवीट व मधुर गाणी देणारे संगीतकार आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली सुमधूर गितांची मैफल ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ चे आयोजन करण्यात आले होते.

जगण्यातील आर्तता, उत्कटता, हर्ष आणी आनंदाचा अनोखा मिलाप आर.डी.बर्मन यांच्या संगितात होता याची प्रचिती प्रत्येक गाण्यातून येत होती. ख्यातनाम लेखक अंबरीश मिश्र यांचे अभ्यासपुर्ण निवेदन आणी आठवणी बर्मन यांच्या संगिताचे मर्म उलगडून दाखविण्यासाठी पुरक ठरले. ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ या मैफलीचे विश्वास लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते.

सुप्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर, गायक मिलींद धटींगण व विवेक केळकर यांनी ही गाणी सादर केली. ‘इस मोड से जाते है’, ‘चुनरी संभाल गोरी’, ‘ओ मांझी रे’, ‘जाने क्या बात है’, ‘तेरे बिना जिया लागेना’, ‘आज उनसे पहली मुलाकात होगी’ अशा एआपेक्षा एअ सरस गितांनी मैफीलीची रंगत उत्तरोत्तर वाढवत नेली. या मैफलीची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.

‘चित्रपट चावडी’

‘द स्विट हिअर आफ्टर’
शनिवार, दि. 06/01/2018

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत कॅनेडाचे चित्रपट दिग्दर्शक अॅटम एगोयान यांचा ‘द स्विट हिअर आफ्टर’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

चित्रपटात कॅनडातील एका छोट्या गावात शालेय बसच्या अपघातात अनेक मुले मृत्युमुखी पडतात. एक वकील त्या गावातील लोकांसाठी विशेषता ज्यांची मुले त्या अपघातात वारली त्यांना मदत करण्यासाठी येतात परंतु त्यामुळे त्या छोट्या गावातील सर्वांचे जीवन ढवळून निघते. दिग्दर्शकाने एका फार मोठ्या शोकांत अनुभवातून सुद्धा एक आशेची, सहवेदनेची फुंकर घातली आहे. सिनेमा पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

मुलाखतींच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या सत्काराचे आयोजन

(शनिवार, दि.17/08/2013)
नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आठवणींवर आधारित ‘आठवणी नाशिकच्या’ हा मुलाखतींचा कार्यक्रम संस्थेच्या रेडिओ विश्वास 90.8 एफ.एम.ने नाशिककर श्रोत्यांना 14 भागांच्या प्रसारणातून सादर केला. सदर कार्यक्रम नाशिकच्या कलासंस्कृतीची अनोखी ओळख करून देणारा ठरला. यात नाशिकच्या सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, संगीत, नृत्य, पत्रकारिता अशा निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. या कार्यक्रमातून नाशिकबद्दलची दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती व आठवणी रसिकांसाठी सुवर्णयोग ठरल्या.

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 तर्फे ‘आठवणी नाशिकच्या’ या मुलाखतींच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार विश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्ष व रेडिओ विश्वासचे सचिव विश्वास ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

यशवंतराव ते विलासराव’ व्याख्यान वक्ते

पत्रकार मधुकर भावे बुधवार, दि.14/08/2013
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे ‘यशवंतराव ते विलासराव’ या विषयावर व्याख्यानाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्‍वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले. नीती आणि राजकारणाचा समन्वयक साधून कला-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी कृतिशील योगदान दिले. तीच परंपरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आपापल्या परीने जोपासली आहे. सातत्याने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारी ही व्यक्तिमत्त्वे माणूस म्हणूनही मोठी होती. लोकहितासाठी त्यांनी राजकीय देव्ष बाजूला ठेवला. हे त्यांचे मोठेपण होते. विचार, व्यवस्था, परिवर्तन यांचा सातत्याने विचार करणारी ही सर्व समाजकारणी होती. त्यांचा आदर्श आजच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे. संस्कारांचे राजकारण पुन्हा सजविण्याची आवश्यकता आहे. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधायक आणि विकासात्मक कार्याचा वेध घेत श्री.भावे यांनी अनेक आठवणी कथन केल्या.

याप्रसंगी आमदार जयप्रकाश छाजेड, प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ.शोभा बच्छाव, संजय नागरे, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. दिनेश बच्छाव, श्रीकांत बेणी, प्रा. यशवंत पाटील, दामोदर मानकर, मोठाभाऊ भामरे, शरद पुराणिक, हंसराज पाटील व नाशिककर रसिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

‘मला भेटलेले शिल्पकार-चित्रकार’

व्याख्याते – सुप्रसिद्ध कलासमीक्षक श्रीराम खाडिलकर – शुक्रवार, दि.28/02/2014
श्रीराम खाडिलकर यांच्या भारतीय शिल्पकार-चित्रकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘मला भेटलेले शिल्पकार-चित्रकार’ या दृकश्राव्य व्याख्यान संपन्न झाले. भारतीय चित्रकार-शिल्पकारांनी आपल्या कलाकृतीतून स्वतःतील कलेचे अस्सल सत्व कलारसिकांसमोर आणले आणि त्यातूनच भारतीय चित्रशिल्प परंपरेला नवा विचार दिला हेच नव्या पिढीतील कलावंतांसाठी व रसिकांसाठी संचित आहे. प्रयोगशीलता आणि संशोधनवृत्तीतून अभिजात कलाकृती निर्माण करता येते, या ध्यासातून त्यांनी कलानिर्मिती केली. साध्यासाध्या घटना व प्रसंगातून जीवनाचा अर्थ, सारांश या कलावंतांनी जगासमोर आणला. असे श्रीराम खाडीलकर म्हणाले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्याख्यान चित्रकार राजेश सावंत, प्रफुल सावंत, कैलास ह्याळीज, पंडित खैरनार, मुक्ता बालिगा, भि.रा.सावंत व कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक आर्डिनो दिनानिमित्त’ मोफत प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, आयमेक संस्था, विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 28 मार्च 2015 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळात ‘आर्डिनो डे’ निमित्त मोफत प्रात्यक्षिक कार्यशाळेचे गंगापूर रोड येथील संस्थेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले. दि.28.3.15 हा दिवस आंतरराष्ट्रीय आर्डिनो डे म्हणुन पाळण्यात येतो. डॉक्टर, इंजिनिअर, विद्यार्थी, कलाकार, गृहिणी अशा अनेक लोकांच्या मनात असलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी इटली या देशातील मॅस्मो बँझी या प्राचार्याने एक उपकरण तयार केले त्याचे नाव आर्डिनो होय. या उपकरणामुळे आपल्या मनात असलेल्या कल्पना प्रत्यक्षात आणणे खुप सोपे झाले आहे. घरातील व व्यावसायिक ठिकाणी वापरण्यात येणा-या असंख्य वस्तू जसे फ्रीज, रेडिओ, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, रोबोट, इलेक्ट्रिक उपकरणे इत्यादींना आर्डिनोच्या सहाय्याने नियंत्रित करता येते. या कार्यशाळेत आर्डिनो कंट्रोल्ड रोबोट सारखे अनेक प्रोजेक्टचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. त्याचबरोबर आर्डिनो सहज आणि सोप्या पद्धतीने कसे वापरावे हे शिकविण्यात आले. या मोफत प्रात्यक्षिक कार्यशाळेचा इंजिनीअरींगचे विद्यार्थी, व परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. आयमेकचे विराज रानडे व त्यांच्या सहका-यांनी सदर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटप शिबीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय-भारत सरकार, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व संकल्प बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटप शिबिराचे आयोजन कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात आले. अपंग बांधवांच्या कल्याणासाठी समाजातील सर्व थरातील जनतेने एकत्र येऊन त्यांच्याप्रती विकासात्मक जाणीव निर्माण करावी, यासाठी शासन व समाजाचा दृष्टिकोन पालकत्वाचा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कुटुंबातील अपंग व्यक्तीविषयी जागरुक रहाणे महत्त्वाचे आहे. यासाठी विविध वैद्यकीय तपासण्या वेळीच कराव्यात त्यामुळे अपंगांची संख्या घटेल. सेवाभावी संस्थांनी आयोजित केलेल्या अपंग शिबिरातून त्यांचे जीवन सुखकर व आनंददायी होण्यास मदतच होत असते. यातून त्यांना योग्य दिशा मिळत असते, असे प्रतिपादन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले. अपंग हक्क विकास मंचचे विजय कान्हेकर म्हणाले की, अपंगांचे जीवनमान उंचावण्यासाठी, सक्षमीकरणासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही चळवळ आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, अपंगांचे पुनर्वसन ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, त्यातून मूलभूत स्वरूपाचा विकास साध्य होईल. शासनाने चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मागे खंबीरपणे उभे रहावे व आर्थिक बळ उपलब्ध करून द्यावे. यावेळी अपंग बांधवांना तीनचाकी सायकली, कॅलिपर्स, श्रवणयंत्रे, कुबड्या, व्हील चेअर्स इत्यादींचे वाटप करण्यात आले. समाजकल्याण विभागाचे पी.यू.पाटील यांनी अपंगांच्या विविध अडीअडचणी सांगितल्या. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विनायक रानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहास तेंडूलकर यांनी केले.

आपणही जिंकू शकतो’ सादरकर्ते – सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मनातला आत्मविश्वास जगवणाऱ्या ‘आपणही जिंकू शकतो’ या प्रसाद कुलकर्णी यांचा लोकप्रिय प्रेरणादायी कार्यक्रम प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाला. आयुष्यात अनेक संधी चालून येत असतात. परंतु आपण हे करू शकतो का? या भीतीपोटी, तसेच नकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने आपल्या हातातील संधी जातात. यामुळे प्रत्येक गोष्ट मी करू शकतोच, असा सकारात्मक दृष्टिकोन व विश्वास बाळगल्यास आपले यश निश्चित आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांनी केले. प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले की, जगण्यामध्ये सकारात्मक विचार असायला पाहिजेत. लोकांना आपल्यात काय गुण, दुर्गुण आहेत ते माहीत असतात. परंतु ते सुप्त अवस्थेत असतात. भोवतालच्या वातावरणाने दुर्गुण बाहेर येतात. चांगल्या गुणांसाठी आत्मशोधन करण्याची गरज असते, तरच ते बाहेर येऊन आपले जीवन यशस्वी होऊ शकते. प्रबळ आत्मविश्वास असल्यास कोणत्याही कार्यात मन कचरत नाही. प्रत्येकाने काळाबरोबर चालायला शिकले पाहिजे. यासाठी स्वतःमध्ये योग्य बदल घडविण्यासाठी सक्षम व्हा. आपल्यातील स्व बाजूला सारून इतरांशी संवाद साधा. आपल्या आंतरिक ताकदीवर विश्वास ठेवून कायम सकारात्मक विचार केल्यास जीवनात यश हे केवळ आपले असेल. प्रसाद कुलकर्णी यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला तर राजेश हिवरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नाशिककर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘युवा स्वातंत्र्य ज्योती रॅलीचे आयोजन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘युवा स्वातंत्र्य ज्योती रॅली’चे आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी व स्वातंत्र्याविषयी आदराची भावना जागृत होण्यासाठी ‘युवा स्वातंत्र्य रॅलीचे आयोजन करण्यात येते. रॅलीमध्ये नाशिक शहरातील सर्व महाविद्यालयातील युवक-युवती, स्थानिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, प्रशासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. सजवलेल्या बग्गीत अक्षता वाघ ही भारतमातेच्या वेषभूषेत होती. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या कर्तृत्वाची ज्योत देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्यात रुजवावी, त्यातून देश विकासासाठी निश्चित विधायक काम करण्याची प्रेरणा समाजाला द्यावी असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी याप्रसंगी केले. रॅलीचा प्रारंभ मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय, शिवाजी चौक, जुने सिडको, नाशिक येथून होऊन अशोकवन कॉलनी-गोपालकृष्ण चौक -सप्तश्रृंगी चौक-भाजी मंडई-शिवाजी चौक-महात्मा फुले चौक -औदुंबर कॉलनी -राणाप्रताप चौक-शिवाजी चौक मार्गे रॅलीचा समारोप मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय, शिवाजी चौक, जुने सिडको येथे करण्यात आला. समारोपानंतर प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे व कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी उपस्थितांकडून संविधानाचे वाचन करून घेतले. सुत्रसंचालन राजेश हिवरे यांनी केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या विश्वस्त दीपाली मानकर यांनी संयोजन केले.

चित्रकलेतील सौंदर्य’ या विषयावर दृकश्राव्य व्याख्यान

व्याख्याते – सुप्रसिद्ध चित्रकार आशुतोष आपटे
निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे, त्यासाठी डोळे ही संवेदनाक्षम घटना व सत्य असते. कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद हा शब्दांपलीकडे असतो तो जाणीवेतून होत असतो. कलेच्या आस्वादाची प्रक्रिया ही मनाच्या बऱ्या-वाईट अवस्थेपासून सुरू होते आणि कलेचा आशय शोषून घेण्यापर्यंत तिचा प्रवास असतो. आस्वादातून अंतःकरणाचा दरवाजा उघडतो आणि त्यातूनच सौंदर्याचे अवकाश तयार होते, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रकार आशुतोष आपटे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत ‘चित्रकलेतील सौंदर्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रतिष्ठानच्या सभागृहात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जागतिक आणि भारतीय चित्रकलेत अनेक प्रयोग झाले आहेत आणि त्यातूनच प्रयोगशीलता आली. चित्रांचे विषय, चित्रशैली, रंगलेपन, समकालीन वास्तव व परंपरांचा मेळ कलाकृतीतून मांडण्याचे प्रयोग होत गेले आणि पारंपारिक चित्रशैलीतून सुरू झालेला प्रवास अमूर्त चित्रांपर्यंत पोहोचला आहे. यातून चित्रसाक्षरता वाढीस लागली आहे असेही श्री.आपटे म्हणाले. यावेळी त्यांनी चित्रकलेच्या परिवर्तनशील वाटचालीला आढावा घेतला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. श्री.आपटे यांचा सन्मान विश्वास को-ऑप.बँकेचे जनसंपर्क संचालक मंगेश पंचाक्षरी यांनी केला तर सुत्रसंचलन रघुनाथ फडणीस यांनी केले.

‘साद’ लघुनाटिका संग्रहाचे प्रकाशन

आजच्या गतिमान माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बालसंस्काराचा प्रयोग अत्यंत परिणामकारकपणे ‘साद’ या पुस्तकातून आला आहे. मुलांमधील अभिरुची घडविण्याची प्रक्रिया यातून आली आहे. लहान मुलांमध्ये भाषेच्या विविध अविष्कारांची जोपासना कशी करावी तसेच विज्ञानाची शिकण्याची वाट सोप्या पद्धतीने दाखविण्याची किमया प्रत्येक पानापानात आली आहे. वाढता चंगळवाद व भौतिक सुखाचे आकर्षण यासारख्या आव्हानातूनही वाचन संस्कृती टिकविण्याची जबाबदारी ‘साद’ सारख्या पुस्तकातून होत असते असे प्रतिपादन दैनिक सकाळचे संपादक श्रीमंत माने यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेखा अशोक बोऱ्हाडे (गायखे) यांच्या ‘साद’ या लघुनाटिका संग्रहाचा प्रकाशन समारंभ प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी श्री. माने बोलत होते. यावेळी बोलताना मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सचिव नीलिमाताई पवार म्हणाल्या की, समाज घडविण्याची कास घेऊन तळमळीने शिकविणाऱ्या शिक्षकांची आज समाजाला खरी गरज असून शिक्षणाच्या अनुभवातून निर्मितीची प्रेरणा समाजाला दिशादर्शक म्हणूनच उपयुक्त आहे. लेखनातून व शिक्षणातून येणारा विचार सर्वदूर व दीर्घकाळ परिणाम करणारा असतो. नानासाहेब बोरस्ते म्हणाले की, संस्कारक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांसोबतच पालकांनी स्वीकारायला हवी अशा पुस्तकातून ही जबाबदारी पेलणे सोपे जाईल. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, मुलांच्या घेणाऱ्या प्रक्रियेत आईचा मोलाचा सहभाग असतो. शिक्षण क्षेत्रातून मुलांच्या अनुभवाचे संचित ‘साद’ या पुस्तकातून प्रभावीपणे आले आहे.

लोकसंवाद उपक्रमांतर्गत ‘आधुनिक तंत्रज्ञान-जग व भारत’ या विषयावर व्याख्यान

व्याख्याते – सुप्रसिद्ध पत्रकार व लेखक निळू दामले
जगभरात सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून माहिती व ज्ञान यांच्या संयुगातून एक नवे जग निर्माण होत आहे. आर्थिक श्रीमंतीत वाढ होत असून जगातल्या सर्व संस्कृतीचा समन्वयाचा मार्गही माहिती तंत्रज्ञानाने साधला जात आहे. या आधुनिकतेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी, आव्हान स्वीकारण्यासाठी भारतातील जनतेने आपली मानसिकता तयार करावी तसेच त्यासाठी सोशल इंफ्रास्ट्रक्चर उभे करावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार व लेखक निळू दामले यांनी केले. महाराष्ट्राचे थोर शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 102 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत ‘आधुनिक तंत्रज्ञान-जग व भारत’ या विषयावर प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित व्याख्यान ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतातील शिक्षण व्यवस्था व विद्यापीठ पातळीवरील शिक्षण यात अमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा विकास हा सर्वसामान्यांचा मूलभूत विकासाचा पर्याय म्हणून रुजवण्याची गरज आहे. औद्योगिकीकरणाने क्रांती झाली व त्यातून अर्थकारण बदलले पण कामगारांमध्ये कौशल्यपूर्णता किती आली याचेही मूल्यमापन होणे आवश्यक आहे. नजिकच्या काळात नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्रांती होणार असून आरोग्यविषयक संशोधनात अभूतपूर्व बदल घडणार आहेत. यावेळी श्री. दामले यांनी वैज्ञानिकांनी काही वर्षांपूर्वी वर्तवलेल्या संशोधनाच्या विकासाची दृकश्राव्य माध्यमाद्वारे माहिती दिली. रोजच्या जगण्यातील घटनांकडे जाणीवपूर्वक बघण्याची गरज असून पर्यावरण संतुलनाकडेही लक्ष पुरवण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर विधायक आणि सकारात्मकतेसाठी व्हावा. जागतिकीकरणामुळे आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम होण्यावरही त्यांनी भाष्य केले. कृषी विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनात वाढ करावी तसेच बदलत्या हवामानाची वेध घेणारी यंत्रणा उभी करावी. विविध पिके आणि त्यातून मिळणारी अर्थप्राप्ती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतीसाठी अवजार यंत्रे, बियाणे यावर संशोधनात्मक चिंतन होण्यावरही त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शेतीचा प्रयोग करण्याचेही श्री. दामले यांनी आवाहन केले. निळू दामले यांचा सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकदादा पाटील यांनी केला. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. परिचय विश्वस्त संजय नागरे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन रघुनाथ फडणीस यांनी केले.

समांतर सिनेमा आणि भारतीय चित्रपटसृष्टी’ व्याखान सादरकर्ते

सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक गणेश मतकरी
समांतर सिनेमाच्या चळवळीने अभिरुचीची नवी वाट चोखाळून रोजच्या जगण्याच्या विषयांना कलात्मकता बहाल केली तसेच चित्रपटातील भूमिकांचा सूक्ष्म आणि बारकाईने विचार करून जनसामान्यांचे रोजचे प्रश्न मांडले. त्यातून नवी वैचारिक मांडणी केली व चित्रपटसृष्टीला नवी अविष्काराची दिशा दिली, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत ‘समांतर सिनेमा आणि भारतीय चित्रपटसृष्टी’ या विषयावरील गणेश मतकरी यांचे दृकश्राव्य व्याख्यान प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाले. ते पुढे म्हणाले की, समांतर सिनेमातून प्रेक्षक घडवण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होती. विचारदर्शक वास्तववादी विचार आणि नाविन्याचा शोध यातून समोर आला. त्यामुळे चित्रपटसृष्टीला नवा आयाम मिळाला. सत्यजित रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, बासू चटर्जी, केतन मेहता या दिग्दर्शकांनी समांतर सिनेमाचा प्रेक्षक घडवला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजेश हिवरे यांनी केले. गणेश मतकरी यांचा परिचय रघुनाथ फडणीस यांनी केला तर सन्मान डॉ.श्याम अष्टेकर यांनी केला. कार्यक्रमास चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व्याख्यान

डॉ.लेखा आदिक पाठक
गतिमान जीवनशैलीत, भैातिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आपणा सर्वांना शारीरिक स्वास्थ्य ह्या गोष्टींचा विसर पडत चालला आहे. याचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो. अतिश्रम व तणावपूर्ण जीवन यामुळे हृदयरोगासारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. यासाठी शरीराच्या नियमित तपासण्या करण्याची गरज असून वयाच्या चाळीशीनंतर जागरुक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘यातनाम हृदयरोगविकार तज्ञ डॉ. लेखा आदिक पाठक यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन-नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना डॉ.लेखा आदिक व डॉ. मनोज चोपडा यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.मनोज चोपडा यांचा सन्मान प्रतिष्ष्ठानचे विश्वस्त संजय नागरे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले.

सामूहिक योगसाधना शिबिर

योगाभ्यास हा मनाला आनंद व शुद्धी देणारा असून त्या माध्यमातून जीवनात चैतन्य, सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण होण्यास मदत होते. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान यांचाही पूरक संबंध योगाभ्यासाशी आहे त्यातून आत्मविश्वासपूर्ण, तणावमुक्त आयुष्याची निर्मिती होते. त्यासाठी योगाभ्यास ही जीवनशैली म्हणून प्रत्येकाने स्वीकारावी असे प्रतिपादन सुप्रसिद्ध योग पंडित पिराजी नरवडे यांनी केले. विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, निसर्गयोग निसर्गोपचार केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योगसाधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शवासन, ताडासन, वृक्षासन, वक्रासन, कपालभाती, श्‍वसासन, प्राणायाम, त्रिकोणासन, इत्यादी आसने उपस्थितांकडून करून घेतली. आणि आसनांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. या सामूहिक योग साधनेसाठी मोठ्या प्रमाणावर साधक उपस्थित होते.

पाठदुखी जनजागृती अभियान’ प्रबोधनपर व्याख्यान : डॉ. मुकेश अग्रवाल आज ऐंशी ते नव्वद टक्के लोक हे पाठदुखी व मानदुखी ने त्रस्त असून तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना हा त्रास होतो आहे. व्यायामाचे चुकीचे प्रकार, आरामदायी राहणीमान, क्षमतेपेक्षा अधिक काम व सातत्याने दूरचा प्रवास ही या आजाराची कारणे आहेत. यावर उपाय म्हणजे नियमित शास्त्रशुद्ध व्यायाम, शरीराची लवचीकता वाढवणे, धूम्रपान टाळणे, पोषक आहार यांची सांगड घालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मुकेश अग्रवाल यांनी केले. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, आधारशीला चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक जनजागृती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाठदुखी जनजागृती अभियान’ प्रबोधनपर व्याख्यानात ते बोलत होते. सावरकरनगर येथील विश्वास क्लब येथे सदर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी डॉ. मुकेश अग्रवाल यांनी पाठदुखी आजाराची लक्षणे व उपाय याविषयी शास्त्रशुद्ध व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की, रोज सकाळी चालण्याचा व्यायाम, गरम पाण्याने शेकणे, पोषक आहार, योगासने यांचा जीवनशैलीत समावेश करावा. घरगुती व्यायाम करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त उपयुक्त असेही ते म्हणाले. यावेळीत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गझलनवाज भीमराव पांचाळे यांची ‘गझल मैफल’

गझल सम्राट भीमराव पांचाळे यांच्या ‘‘अंदाज आरशाचा वाटे, खरा असावा । प्रत्येक माणसाचा तो चेहरा
असावा’’ असा माणूसकीचा गहिरा रंग आणि सुरांची बरसात घेऊन जगण्यातील माणूसपणाच्या मूल्यांचा शोध घेत काळजाला भिडणाऱ्या एकाहून एक सरस मराठी हिंदी गझलांनी रसिकांना अनोखा आनंद दिला. विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रम नववर्षाच्या पुर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख, आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी, याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास गृप तर्फे गझल सम्राट भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या अनोख्या मैफीलीस नाशिककर श्रोत्यांनी अभूतपुर्व दाद दिली. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वास लॉन्स येथे करण्यात आले होते. सुखदु..खाच्या व्यवस्थापनाची गोष्ट सांगणे म्हणजे गझल अशा आशयाची अनुभूती शब्द सुरांतून प्रकट होत होती. अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले तर दु…ख वाटण्याचा प्रवासही सहज झाला असता त्यासाठी ‘जगणार्‍याला जीवन कळते, पळणार्‍याला नाही’ अशा शब्दात जगण्याची महती गझल सम्राट भीमराव पांचाळे यांनी पेश केली. ‘‘जखमा अशा सुगंधी, झाल्यात काळजाला, केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा’ यातून जगण्याचा शोध घेता घेता रसिक अंर्तमुख झाले. जाओ शिसे का बदन लेके, मज नको हे गगन, जीवनाला दान द्यावे लागते, हा असा चंद्र अशी रात, तु नभातले तारे माळलेस का, ए सनम आँखो की मेरी, भळभळते सांगतेस का, उगा भांडतेस, कारणे नाहीतमोठी, गरीबाच्या ल3/4 नवरी. अशा लोकप्रिय गझलांनी मंत्रमुग्ध केले. मराठी गझलेचा श्वास गझलनवाज, भीमराव पांचाळे यांनी आपल्या बहारदार सुरांमधून जिवंत केला. गझलेतील शब्दांची स्पंदने आपल्या तलम आणि तरल नजाकतीतून भीमराव पांचाळे अशी काही पेश केली की, रसिक शहारूनच गेले.

या कार्यक्रमाची रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी, सारस्वत को-ऑप बँक लि., विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, श्री पद्मावती केटरर्स, झेलम मसाले, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, विश्वास लॉन्स याचबरोबर टकले ज्युएलर्स, फ्रावशी अॅकेडमी, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्युट अॅण्ड रिसर्च सेंटर, संकलेचा कॉन्स्ट्रक्शन्स, एसडब्ल्यूएस फायनान्शियल सोल्युशन्स प्रा.लि. यांचे सहकार्य लाभले.
मैफलीचे बहारदार सुत्रसंचलन दत्ता बाळ सराफ यांनी केले. भिमराव पांचाळे यांना हार्मो नियमवर जगदीश मिस्त्री, तबला गिरीष पाठक, संतूर अबार अहमद, व्हायोलीन इकबाल वारसी यांनी केली. मेजर कृष्णा खोत, कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिक हजर होते.

मैत्र कारवाँ 2016

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँन्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक ही निरोगी समाज निर्मितीच्या स्वप्नपूर्तीसाठी बाल, युवा आणि महिलांच्या सक्षमीकरणावर काम करणारी नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. गेली 15 वर्ष नाशिक शहर आणि परिसरात समविचारी संस्था,संघटना तसेच व्यक्तींना सोबत घेऊन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँन्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक मध्ये काम करीत आहे. या समाज निर्मितीचाच एक भाग म्हणून ‘मैत्र कारवॉ 2016’ चे आयोजन करण्यात आले .

का मैत्र कारवाँ ?

नाशिक हे महाराष्ट्रातील आग्रगण्या औद्योगिक शहर असून आजही त्याची ‘गाव’ म्हणून ओळख अबाधित आहे. नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय शाळा, महाविद्यालये तसेच औद्योगिक कारखाने आले तरी अजूनही पारंपारिक जत्रा, उत्सव, उरूस तेवढ्याच आनंदाने साजरे केले जातात. औद्योगिक शहर असल्यामुळे आता नाशिकच्या वर्तमानात रोजच नवनवे बदल घडतांना दिसत आहेत. रोजच नव्याने नागरिकांच्या संख्येत वाढ होतांना दिसते आहे. या होणाऱ्या वाढीला नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक चेहर्‍याची ओळख करून देण्यासाठी तसेच त्यांनाही या गावगाड्यात सहभागी करून घेण्यासाठी ‘मैत्र कारवाँ 2016’.

मैत्र कारवाँ 2016 ची संकल्पना

सध्या नाशिक शहरात एकूणच कौंटुबिक तसेच सार्वजनिक हिंसाचाराचे प्रमाण वाढताना दिसते आहे. हिंसाचारातला तरुणांचा वाढता सहभाग हा अधिक संवेदनशील विषय बनला आहे. यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी तसेच तरुणाई बरोबरच सर्व विषयावरचा सर्व पातळीवरचा संवाद वाढविण्यासाठी मैत्र कारवाँ 2016 चे आयोजन करण्यात आले. मैत्र कारवाँ 2016 च्या आयोजन समितीत जास्तीत-जास्त युवांचा सहभाग हेतुपरस्सर ठेवण्यात आला होता. स्त्री पुरुष विषमतेचा स्त्रियांवर होणारा सर्व प्रकारच्या परिणाम सामाजिक चळवळीमुळे फार लवकर नजरेत आला आणि त्यानुषंगाने पिडीत स्त्रियांवर योग्य ती सर्व प्रकारची परिवर्तनाची चळवळ केली गेली. पण त्याच बरोबरीने पुरुषांवर समाजातील स्त्री पुरुष विषमतेचा होणारा विपरीत परिणाम समजावून घेऊन त्या परिणामातून पुरुषांना मुक्त करू स्त्री पुरुषांचा निरोगी समाज घडावा यासाठी ‘मैत्र कारवाँ 2016’. ज्यामुळे सध्याचा युवांचे विषय कोणते? नेमक्या समस्या कोणत्या? जर त्यांचा ‘कारवाँ’ बनवायचा असेल तर नेमकी सुरुवात कुठून करावी? या सर्व गोष्टीची अचूक माहिती मिळाली आणि काम करणे सोपे झाले. मैत्र कारवाँ 2016 च्या संकल्पनेत एक दिवशीय कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. ज्यात उद्योगशील, प्रेरणादायी युवांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले. युवांच्या संदर्भातील 10 ते 15 विषय निश्चित करून त्याप्रमाणे स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. उद्घाटनानंतर युवा या सर्व स्टॉल्सना भेटी देतील आणि त्या त्या विषयाच्या तज्ञ संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सहभागी युवाना त्याचा विषय समजावून सांगावा हे निश्चित करण्यात आले .
आयोजक संस्थांचा परिचयः

कै. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय
समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करणारे नाशिक मधील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालय.

गोसावी बहुद्धेशीय संस्था, नाशिक
समाजातील निराधार, निराश्रीत कुटुंबासाठी तसेच गरीब बालकांसाठी शैक्षणिक काम करणारी नोंदणीकृत सामाजिक संस्था.

विश्वास को.ऑप.बँक लि. नाशिक
20 वर्षापूर्वी स्थापन झालेली नाशिक मधील एक नामवंत बँक.आज बँकेची 400 करोडची उलाढाल असून त्याच्या 12 शाखा आहेत.

सारस्वत बँक (शेड्यूल बँक)
आशिया खंडातील नंबर एक सहकारी बँक सम्यक, पुणे: स्त्री पुरुष विषमतेचा पुरुषांवरही दुष्परिणाम होतो याची जाणीव असलेली आणि ह्या दुष्परिणामांतून पुरुषांना बाहेर काढण्यासाठी पुरुषां सोबत विविध सामाजिक काम, प्रशिक्षणद्वारे भारतात बऱ्याच राज्यात काम कारणारी एक नोंदणीकृत सामाजिक संस्था.

मानस व्यसन मुक्ती केंद्र, नाशिक
अनुसया शिक्षण प्रसारक संस्था यांचे व्यसन मुक्ती साठी काम करणारे मानस व्यसन मुक्ती केंद्र हे नाशिक मधील मान्यताप्राप्त सामाजिक काम आहे. व्यसनान पासून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या सर्व वयोगटाच्या, स्तरावरील लोकां बरोबर मानस काम करीत असते.

समाजकार्य महाविद्यालय
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जिल्ह्यातील एकमेव समाजकार्याचे शिक्षण देणारे महाविद्यालय.

मॅग्नम हार्ट इनिस्टट्यूट
अत्याधूनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण हॉस्पिटल

युवांचा कार्यक्रम असल्यामुळे युवा स्वयंसेवकांची एक टीम आधी तयार करण्यात आली. मुला-मुलींची एकत्र टीम असल्यामुळे ‘मैत्री’ समजावून घेणारे तसेच जबाबदारी पूर्ण ‘वर्तन’ करू शकतील अशा युवांची एक यादी आनंदीचा उत्सव 2016’ च्या स्वयंसेविकांच्या मदतीने करण्यात आली. समाजातील स्त्री-पुरुष विषमता कशी ओळखावी? एक निरागस मुलगा ते हिंसाचारी पुरुष हा प्रवास कसा होतो?, मर्दानगी म्हणजे काय? हिंसाचार कसा घडतो? हे विषय समजावून घेण्यासाठी ह्या सर्व स्वयंसेवकाची एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. मर्दानगी, जेंडर आणि हिंसाचार’ या विषयाचे प्रख्यात प्रशिक्षक आनंद पवार यांनी विविध खेळ तसेच जीवनातील रोजच्या अनुभवांच्या आधारावर हे प्रशिक्षण घेतले. स्टॉलच्या प्रमुखांचेही एकूण चार प्रशिक्षण घेण्यात आले. ज्यात स्टॉलचे विषय, त्या विषयांशी सुसंगत खेळ आणि विषय मांडण्याचे मध्यम निश्चित करून त्या प्रमाणे साहित्य तयार करण्यात आले. यात लागणारे पोस्टर्स तसेच खेळ स्वयंसेवकामधील आर्टिस्ट टीम ने बनवले. मैत्र कारवाँ 2016 ची संकल्पना जास्तीत जास्त युवकांना समजावी आणि त्यांनीही या कारवाँत सहभाग घ्यावा यासाठी एक माहितीपत्रक तसेच पोस्टर बनवण्यात आले. सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य, क्लासेस चे प्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून ही संकल्पना सांगून कार्यक्रमाचे पत्रक व पोस्टर महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डला लावले आणि विध्यार्थ्यांना पत्रक देण्यात आले. महाविद्यालयांजवळील तसेच शहरातील सर्व मोठे बस स्टॉपवरही पोस्टर्स लावण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी महाविद्यालय आवारात कॉर्नर मीटिंग घेण्यात आल्या. यानिमित्ताने स्वयंसेवकांच्या टीमने नाशिक शहर आणि परिसरातील जवळ जवळ 90 ते 92 महाविद्यालयांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या मैत्र कारवाँ 2016 साठी 16 ते 35 चा वयोगट अपेक्षित धरला होता. जे युवा महाविद्यालयांबाहेर आहेत त्यांच्या पर्यंत कार्यक्रमाची माहिती जावी यासाठी शहरातील सर्व भागातील वर्तमान पत्रामधून पत्रकं टाकण्यात आले. सर्व वर्तमान पत्र आणि टी व्ही चॅनेल्स द्वारे कार्यक्रमाच्या बातम्या छापण्यात आल्या. रेडीओ विश्वास 90.8 समुदाय रेडिओ द्वारे मैत्र कट्टा हा स्वतंत्र कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. ज्यात स्वयंसेवक, स्टॉलचे आयोजक, सहभागी संस्था प्रतिनिधी यांच्या मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. 11 जुलै ते 8 ऑगस्ट 2016 दरम्यान प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सायंकाळी 5 ते 5.30 यावेळेत पहिल्यांदा आणि गुरुवार, शुक्रवार व शनिवार 5 ते 5.30 या वेळात त्याच मुलाखती पुनः प्रसारित करण्यात आल्या.

मंगळवार 9 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत विश्वास लॉन्स, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 13. येथे ठरल्यानुसार प्रत्यक्ष कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसंस्कृती ढोल ताशा पथक ह्या नाशिकचा पहिल्या ढोल ताशा पथकाने झाले. पथकाच्या शेवटी स्वयंसेवकानी मशाल पेटून ती मशाल सर्व स्टॉलवर फिरून परत विचारपीठावर आणून कार्यक्रमाचे उद्घाटक संतोष गर्जे याच्याकडे देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विश्वास बँकेचे संस्थापाक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यानंतर विशेष निमंत्रित प्रमुख पाहुणे त्यावेळचे नाशिकचे आयुक्त एस. जगन्नाथन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, नाशिकचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी आपापल्या आयुष्याचे अनुभव सांगून उपस्थित युवांना मार्गदर्शन केले. करियर म्हणजे काय? करियारच्या संधी कशी ओळखावी, त्या संधीचा फायदा कसा घ्यावा यासंदर्भात सर्व मार्गदर्शकानीं स्वतःचे अनुभव मांडले. ज्यांना ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, आनंद घ्यायचाआहे त्यांनी आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रसंगांना सामोरे आणि आपल्या बाजूने सर्व प्रकारचे/ शक्य तेवढे सर्व कष्ट करावेत. मग जर काही बाह्य परिस्थितीमुळे शेवटचा निकाल अपेक्षे प्रमाणे आला नाही तरी त्याचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नये असे आपापल्या अनुभवांवरून युवांसमोर मांडले. मैत्र कारवाँ 2016 हा युवांनी घेतलेला कार्यक्रम होता म्हणून त्यासाठी संतोष गर्जे सारखे युवा कार्यकर्ते बीड वरून आले होते. संतोष गर्जे हे बीडच्या गेवराई ह्या गावी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुलांना तसेच ज्यांना कोणीही नाही अशा बालकांसाठी बालग्राम नावाची संस्था चालवितात. स्वतःच्या कामाचे अनुभव, त्यात येणाऱ्या अडचणी मांडून वेगळ्या वाटेने जाण्यापेक्षा, वेगळ काहीतरी करण्यापेक्षा कराल ते चांगल करा म्हणजे आपोआप ते वेगळ घडेल, घडवेल असं म्हणत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या सत्राचे आभार तसेच सर्व स्टॉल्सबद्दल थोडक्यात माहिती रेडीओ विश्वास 90.8 समुदाय रेडीओचे राजेश हिवरे यांनी दिली. उद्घाटन सत्रानंतर सर्व सहभागी युवांनी वेगवेगळ्या खालील स्टॉल्सना भेटी दिल्या, तिथे मांडलेल्या खेळांद्वारे युवांचे प्रबोधन करण्यात आले.

मैत्र कारवाँ 2016 च्या तिसर्‍या सत्रात पँनल डिस्कशन घेण्यात आले. ज्यात दिव्य मराठीच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती राऊत यांनी करियर करताना मुला-मुलींना काय काय कराव लागतं, काय काय प्रश्नांना सामोरे जावे लागते, समाजातील स्त्री पुरुष विषमतेमुळे मुली शिक्षण तर घेतात पण त्या शिक्षणाचा वापर करण्याची संधी मात्र त्यांना मिळत नाही त्यामुळे त्य मुलींचे व्यक्ती म्हणून तर नुकसान होतेच पण देशाचेही मोठे नुकसान होते याची मांडणी त्यांनी उदाहरणासह दिली. नव महाराष्ट्र युवा अभियानाचे प्रमुख तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक दत्ता बाळसराफ यांनी युवा चळवळ म्हणजे नेमके काय? त्याची आवश्यकता काय? त्यासाठी युवानी कसा पुढाकार घेणे आवश्यक आहे याची मांडणी केली. त्यांनी सहभाग घेतलेल्या चळवळींचा अनुभव मांडले. मर्दानगी, पुरुषसत्ताक समाज व्यवस्था आणि हिंसाचार यांचा परस्पर संबंध कसा आहे, समाजातील सर्व व्यवस्था हळूहळू स्त्री पुरुष विषम समाज कसा निर्माण करत जातो आणि आपणही जाणते-अजाणतेपणे या व्यवस्थेचे कसे बळी जातो मग त्या प्रवाहाचे भाग बनतो आणि स्त्री पुरुष विषमता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवतो याची उदाहरणासह मांडणी केली. स्त्री पुरुषांमध्ये समानता आणायची असेल तर आपण आपली प्रत्येक वर्तणूक विचारपूर्वक केली पाहिजे असा संदेश आनंद यांनी त्यांच्या मांडणी मधून दिला. हे पटवून सांगण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्यातली बरीच उदाहरण दिली. विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी स्वतःचा मध्यमवर्गीय युवा ते एक यशस्वी उद्योजक हा प्रवास कसा घडला, यात त्यांनी कशी प्रतिकूल परिस्थितीवर मत करत यश संपादन केले याची माहिती दिली तसेच यशासाठीच्या टिप्स दिल्या. याच सत्रात कै. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या रक्तदान स्टॉलमध्ये ज्या युवानी रक्तदान केले त्यांचा गौरव करण्यात आला.

मैत्र कारवाँ 2016 चे उद्घाटन ढोलताशा या एका पारंपारिक कलेने झाली तसेच समारोप नृत्य कलेने व्हावा अशी संयोजाकांची इच्छा होती. त्यानुसार नाशिक मधील एक सुप्रसिद्ध डान्स ग्रुप ए रिस्पेक्ट ग्रुपयांच्या 40 जणांच्या समूहाने हे संकल्पना नृत्य सादर केले. ज्यात युवांनी स्वतःच्या उर्जेचा वापर नकारात्मक कामासाठी केला तर कसा त्या व्यक्तीचा तसेच समाजाचेही नुकसान होते, तीच उर्जा सकारात्मक कामासाठी वापरली तर समाजाच्या हिताचे काम निर्माण होते. याच संदेशावर ‘मैत्र कारवाँ 2016’ या कारवाँ च्या भविष्यातील गठबंधनाची तसेच समाजात स्त्रीपुरुष समानता निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने करावयाच्या वृती कार्यक्रमाच्या स्वतःला दिलेल्या वचननाम्याचे जाहीर वाचन झाले, त्या वचननाम्याची प्रत सर्वांना देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

‘कॅम्पस मैत्र कारवा’ (शुक्रवार, दि.11/11/2016)

‘मैत्र करवां 2016’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांची प्रशिक्षक म्हणून तयारी होण्यासाठी ‘स्वयंसेवकांचे प्रशिक्षण’ घेण्यात आले. मैत्र कारवां अंतर्गत घेण्यात येणारे विषय जसे जेंडर इक्वॅलिटी, शरीराची ओळख, लैगिकता समज-गैरसमज, पितृसत्ता विरोध, छेडछाड, जोडीदाराची निवड, दिल दोस्ती दुनियादारी, व्यसन, रस्ता सुरक्षा आणी सायबर क्राईम हे सर्वच विषय गुंतागुंतीचे असून या विषयात युवांना गंभिरपणे विचार करायला भाग पाडण्यासाठी ह्या विषयाचे जे स्वयंसेवक संचलन करणार आहे. ते सर्वार्थाने अभ्यासू, युवांना समजून घेणारे, न चिडता सर्व प्रकारचे प्रश्न हाताळू शकणारे तज्ञ स्वयंसेवक हवे. नाशिक शहर व परिसरात 92 महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयातील युवांना मैत्र कारवांत सामिल करुन घ्यायचे असेल तर संस्थेकडे मुबलक प्रशिक्षित स्वयंसेवक असणे आवश्यक आहे. तसेच आहे त्या स्वयंसेवकांना अधिक सखोल व निष्णात करणेसाठी ह्या प्रशिक्षणाची आवश्यकता होती.

मैत्र कारवांत ज्या विषयावर अधिक भर दिला जातो त्यापैकी स्वतची पूर्ण ओळख नसल्यामुळे शरीरासंबंधीचे असलेले न्युनगंड जे सामाजिक मानसिकतेतून येणारे व कंपन्यांनी केलेल्या जाहीरातीतून येणारे त्यामुळे तारुण्यात युवा सभंमावस्थेत राहतो व त्यातून अपघात घडतात. त्यातून युवा वर्गाला बाहेर काढायचे तर त्यांच्याशी मोकळेपणाने शरीर, त्याची रचना, त्या त्या अवयवांचा उपयोग आणी त्याबाबतचे गैरसमज या विषयावर बोलणे आवश्यक होते म्हणून प्रसिद्ध जेंडर प्रशिक्षक आनंद पवार यांची शरीराची ओळख, लैंगिकता समज-गैरसमज या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली. प्रशिक्षणासाठी 200 युवांना व्हॅटसअॅप व फेसबुकद्वारे निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी 62 युवांनी प्रशिक्षणास पुर्णवेळ हजेरी लावली.

प्रथम सत्रात आनंद यांनी स्वयंसेवकांशी ‘भाषा’ या विषयावर सर्वांशी संवाद साधला. त्यात त्यांनी शरीर व लैंगिकता यावर भाषा उपलब्ध नसल्याने बोलता येत नाही. त्यामुळे शरीराच्या अवयवांना किंवा लैंगिकता व्यक्त करायला कुठली भाषा उपलब्ध आहे हे समजून घेण्यासाठी पाच गट केले. व प्रत्येक गटाने कार्डशिटवर शरीराची बॉडी आऊटलाईन काढून त्यात जास्तीत जास्त अवयवांची नावे लिहायची त्यांच्या कार्याबाबत किंवा उपयोगावर चर्चा करायची त्यातून काही मुद्दे अधोरेखित झाले.

  • प्रत्येक गटानी खाजगी अवयवांची नावे लिहीली.
  • अवयवांची नावे मराठी व हिंदीत आहे तरी संकोचामुळे त्या भाषेत न लिहता इंग्रजीत लिहली.
  • जे जे वैयक्तिक असते त्या भावना असो कि प्रश्न मनात प्रत्येकाच्या असतात पण पहिले बोलणार कोण हा प्रश्न असतो.
  • प्रत्येक गटात शरीराविषयी मोकळेपणाने चर्चा झाली यालाच शरीर साक्षरता म्हणतात.

जेवणानंतरच्या सत्रात आनंद यांनी सर्वांना गोल करुन उभे राहण्यास सांगितले. व सर्वांना गोलात येऊन एखादी कृती करायला आमंत्रित केले. जो पर्यंत सर्वमान्य कृती जसे गाणे म्हणणे, नाचणे, मेकअप, मॉडेलिंग तोपर्यंत युवा मोठ्या संख्येने आत येत होते. पण जेव्हा एक जण म्हणाली कि मी अशा लोकांना निमंत्रित करते की ज्यांना ‘मास्टर्बेशन/हस्तमैथुन’ करायला आवडते. त्यावर एकदम शांतता झाली मग हळूच एक दोन जण आत येउन उभे राहिले. मग थोडासा गोंधळ झाला चैाकशी केली असता समजले की, मास्टर्बेशन हा शब्दच ब-याच जनांना समजला नाही. त्यांना पर्यायी मराठी शब्द ‘हस्तमैथून’ सांगितला असता तोही काहींना समजला नाही. यावर पुढे बरीच चर्चा झाली चर्चेत ‘मास्टर्बेशन/ हस्तमैथुन’ म्हणजे काय? मुलींना करता येते का? कसं करायचं? त्याचे चांगले वाईट परिणाम. त्यामुळे मर्दानगी कमी होती का? नपुंसकत्व येते का? दिवसातून किती वेळ करावं? ब-याच युवांनी त्यांचा अनुभव सांगितला की त्यांचे मित्र प्यायले की कुठे कॉलगर्ल मिळेल याची चैाकशी करतात. वेश्यावस्तीत जायला तयार होतात. खुप अधीर असतात मग प्रश्न येतो की, दारुमुळे संबंध करायची इच्छा वाढते का? हस्तमैथूनासाठी काय काय साधने वापरावीत? प्रायव्हेट पार्टसची स्वच्छता, निगा व काळजी कशी राखावी? इत्यादी.

आनंद यांनी खुपच खेळीमेळीच्या वातावरणात युवांना याविषयाला धरुन न घाबरवता त्यांच्यातील न्युनगंड बाहेर काढला. कुठेही विषय अश्‍लिल किंवा रंगिन झाला नाही. सातत्याने त्यांनी शास्त्रीय माहिती देत लैंगिक संबंधातील पार्टनरचे अधिकार, आदर, आनंद आणी कायदे समजावले. स्वयसेवकांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना ‘हस्तमैथून’ स्वतच्या शरीराची तात्पुरती इच्छा पुर्ण करणारा शास्त्रीय व कायदेशीर मार्ग आहे. मुलांप्रमाने मुलींनाही हस्तमैथून करता येते आणी शास्त्रीय दृष्ट्या तसे करणे मानसिक संत्तुलनासाठी आवश्यक आहे. सतत बाहेर गावी नैाकरी व्यवसायासाठी असणा-या नव-याच्या बायकोला आपली समाजमान्य नैतिकता टिकवायची असेल तर हस्तमैथून या इतकी शास्त्रीय, स्वतशी संवाद साधणारी स्वतच्या इच्छा पुर्ण करणारी दुसरी गोष्ट नाही.

शिबिराचे फलित

1) स्वयंसेवकांना स्त्री-पुरुष विषमतेमागील सामाजिक, आर्थिक, राजकिय कारणं, जाती/धर्म भेद इ.विषय यापुर्वी माहित होते. पण ह्या ट्रेनिंगमुळे विषमता टिकवणारे बॉडी पॉलिटिक्स ही सविस्तर समजले ज्याचा उपयोग ते मैत्र कारवाँ प्रशिक्षणात विद्यार्थी जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा गप्प न रहाता कौन्सेलिंग करु शकतील.
2) स्वयंसेवकांच्या स्वतच्या शंकांच्या निरसन झाले त्यामुळे अर्धवट ज्ञानातून मुलांमधे होणारे गॉसिपिंग, मुलींबद्दलच्या चीप कमेंटस थांबल्या.

‘पितृसत्ता विरोधी पुरुष’ चर्चासत्र

शनिवार, दि.12/ 11/ 16 व रविवार, दि.13/ 11/ 16)
ज्यांना ज्यांना सामाजिक विषमता हि पितृसत्तेमुळे आली आहे असे वाटते असे सामाजिक कार्यकर्ते जे महाराष्ट्रभरात विविध विषयांवर, विविध क्षेत्रात काम करतात त्यांना एकत्र करुन दर तीन महिन्यांनी ‘पितृसत्ता’ व त्यासंदर्भातील पैलू समजून घेण्यासाठी अभ्यासवर्ग घेतला जातो. दर तीन महिन्यांनी होणारा हा अभ्यासवर्ग महाराष्ट्रातील विविध संस्था संघटनांकडे घेतला जातो.

तिस-या अभ्यासवर्गाचे आमंत्रण विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट यांनी दिल्याने सदर बैठक प्रसिद्ध जेंडर प्रशिक्षक श्री.आनंद पवार व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक अरुण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘धर्म व पितृसत्ता’ या विषयावर नाशिक येथे संपन्न झाली. सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ याचे संयुक्त सहकार्य या उपक्रमास लाभले.

प्रथमत: आनंद पवार यांनी या अभ्यास गटाचे स्थापनेमागील इतिहास व उद्दीष्टे मांडली. त्यानंतर प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक अरुण ठाकूर यांनी ‘पितृसत्ता व धर्म’ या विषयाची मांडणी केली. अरुण ठाकूर यांनी मॅट्रिक्स या इंग्रजी सिनेमाचे शॉटस दाखवून धर्म हि काय संकल्पना आहे? ती कशी हळू हळू प्रत्येकाच्या मनात रुजविली जाते. रोज तेच ते रितीरिवाज, परंपरा पाहून धर्म हि अविभाज्य गोष्ट आहे असे वाटू लागते. त्यामुळे ज्या ठिकाणी मानवता पायद़ळी तुडविली जाते तरी रुढी आणी परंपरा यांचे मुल्यमापन केले जात नाही. वर वर जरी मानवाची भौतिक प्रगती दिसत असली तरी मानवता म्हणून समाजाचा काही भाग अजूनही खूपच मागासलेला, धार्मिक व अंधश्रद्धाळू आहे. त्यामुळे समाजात धर्मा-धर्मात, जाती जातींमध्ये, माणसा-माणसात दरी वाढतांना दिसत आहे. धर्माची संकल्पना तिचा प्रवास व सद्यस्थिती, धर्मातील कर्मकांडे त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग इ. विषयांचा सखोल अभ्यास केला गेला. या चर्चेत विविध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते तसेच युवांनी एकत्र येऊन सामाजिक विषमता हि पितृसत्तेमुळे आली आहे असे मत मांडले.

बैठकीचे फलित

1. धर्म हि संकल्पना, तिचा प्रवास आणी सद्यस्थिती याची सविस्तर माहिती अतिशय सोप्या शब्दात समजली.
2. धर्म हि उंब-याच्या आत मानायची संकल्पना आहे.तसे केल्यास कोणालाच कोंणाचा त्रास होण्याची शक्यता नाही.
3. ज्यांना धर्माचे आचरण करायचे असेल त्या सर्वांना राज्यघटनेने परवानगी दिलेली आहे. सर्वांनी त्याचा अर्थ समजावून घेतल्यास समाजातील तेढ कमी होण्यास मदत होईल. व ख-या अर्थाने मानवता निर्माण होईल.
4. ज्याला समाजात विषमता आहे असे दिसते त्याला समोर दिसणा-या अभासी मॅट्रीक्स पलिकडे सत्य शोधावे लागते आणी जो नविन मार्ग अवलंबेल त्याला त्याची किंमत मोजावीच लागते.
5. सर्व धर्मात कर्मकांडे आहे किंवा नंतर घुसविण्यात आली आहेत. आपल्याला कार्यकर्ते म्हणून ह्या कर्मकांडातून बाहेर रहायचे असेल तर सतत स्वतच्या वर्तणुकीचे मुल्यमापन करत रहावे लागते.

सदर बैठकीकरीता संस्थेच्या समन्वयक अनिता पगारे व स्वयंसेवक, कार्यकर्ते यांनी नियोजन केले. महाराष्ट्रातील 40 कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दोन दिवसिय अभ्यास बैठक संपन्न झाली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने या कालावधीत प्रसिद्ध जेंडर प्रशिक्षक श्री. आनंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पितृसत्ता विरोधी पुरुष’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते व अभ्यास अरुण ठाकूर यांनी पितृसत्ता व धर्म या विषयाची मांडनी केली. चर्चेत धर्माची संकल्पना, तिचा प्रवास व सद्यस्थिती, धर्मातील कर्मकांडे त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग इ.विषयांचा सखोल अभ्यास केला. या चर्चेत विविध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते तसेच युवांनी एकत्र येऊन सामाजिक विषमता हि पितृसत्तेमुळे आली आहे असे मत मांडले.

सदर चर्चेचे समन्वयन संस्थेच्या अनिता पगारे यांनी केले.

चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत ‘पडद्यामागच्या कथा’

सादरकर्ते – सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे – शनिवार, दि.01/02/2014
‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत रसिकांसाठी सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांच्या इंडियन फिल्म अॅकेडमी निर्मित ‘पडद्यामागच्या कथा’ या दृकश्राव्य कार्यक्रम प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी चित्रपटांचा प्रवास उलगडून दाखविला. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत, दिग्दर्शक, पडद्यामागचे कलाकार यांनी कलाकृती निर्माण करताना निर्माण केलेल्या दंतकथा, कमी साधनसामग्री असताना पडद्यावर दाखविलेली तांत्रिकतेची किमया आणि त्यातून निर्माण झालेली अभिजात लोकप्रिय कलाकृती यांचा खुमासदार तितकाच अभ्यासपूर्ण वेध सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी घेतला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्‍वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विजय अहलुवालिया, संतोष पाटील, दिलीप पाटील, प्रकाश वैद्य, अतुल देशमुख व नाशिककर रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com