सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय

Savajanik Vachanaly वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे ही काळाची गरज आहे. यासाठी लेखक, साहित्यिक, निर्माता, संशोधक व कलावंत यांचा वाचक व श्रोते यांच्याशी संवाद होणे आणि या संवादातून सृजनाची प्रक्रिया सातत्याने घडणे हे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ही एक सृजनांचे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. तसेच याअंतर्गत चालणार्‍या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाचनाची व चिंतनाची निरंतर प्रक्रिया चालविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांची मुलाखत मुलाखतकार

कवी किशोर पाठक – ख्रदि.24/11/2013)
महाराष्ट्राचे थोर शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 29 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखतीचे शंकराचार्य संकुल, नाशिक येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्‍वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले. सदर मुलाखत कवी किशोर पाठक यांनी घेतली.

परंपरा आणि आधुनिकतेच्या समन्वयातून वर्तमानाशी नाते जोडण्याचा मी माझ्या लेखनातून सातत्याने प्रयत्न केला. त्यासाठी इतिहासाशी नाळही मी तुटू दिली नाही. घरातील वाचन संस्कारातून अभ्यासपूर्ण वाचनही झाले. संत तुकारामांचे लेखन वाचून यातून सामाजिक सुधारणेचा संदेश परिणामकारकपणे पोहोचला आहे याचीही जाणीव झाली आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या समग्र बदलांचा वेध घेण्याचा प्रयत्न मी लेखनातून केला आहे. असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी केले.तसेच याप्रसंगी त्यांनी साहित्य, सांस्कृतिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक विचारधारा यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी मोठ्या संख्येने नाशिककर जनतेने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

‘यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय’

वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हे एक सृजनाचे व्यासपीठ म्हणून कायर्र्रत आहे. तसेच याअंतर्गत चालणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाचनाची व चिंतनाची निरंतर प्रक्रिया चालविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. विश्वास ज्ञान प्रबोधिनीने यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व वाचनालय या नावाने सुरू केलेल्या ग्रंथालयाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. ग्रंथालयात कथा, कादंबरी, चरित्रे, कविता, नाटके, संदर्भ, बालवाड्:मय, सहकार, बँकिंग, आरोग्य, शिक्षण, कायदा अर्थशास्त्र, पत्रकारिता, विज्ञान, शेती, धार्मिक, व्यक्तिमत्त्व विकास यासह इतर विषयांवरील एकूण ग्रंथसंपदा 15,410 आहे. ग्रंथालयात नियमितपणे मराठी व इंग्रजी भाषेतील 8 वर्तमानपत्रे तसेच 30 नियतकालिके येत असून दि. 31 मार्च 16 अखेर ग्रंथालयाची सभासद संख्या 200 इतकी आहे. ग्रंथालयाच्या परिसरातील वाचक, विद्यार्थी, महिला या ग्रंथालय सेवेचा लाभ घेत आहेत.

नुतन विद्यालय, सैय्यद पिंप्री येथे ‘वाचन प्रेरणा दिन’

शनिवार, दि.15/10/2016)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. वाचनप्रेरणा दिनाच्या निमित्ताने ‘साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नुतन माध्यमिक विद्यालय, सैय्यद पिंप्री’ येथे ग्रंथ दिंडी, व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. संस्थेच्या वतीने शाळेस ग्रंथपेटी भेट देण्यात आली. ज्ञानाच्या माध्यामातून विचारांची वाढ होते व त्यांचा उपयोग समाजाच्या विकासाठी करता येतो. चांगली पुस्तके ही समाजमनाचा आरसा असतात असे विचार शाळेचे प्राचार्य भाऊसाहेब गोसावी यांनी व्यक्त केले. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या पुस्तकांचे वाचन महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक व संस्थेचे कार्यकर्ते हजर होते.

अभिनव बाल मंदीर, नाशिक येथे ‘वाचन प्रेरणा दिन’

शनिवार, दि.15/10/2016)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनप्रेरणा दिनाच्या निमित्ताने मविप्र संस्थेचे नाशिक येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत ग्रंथ प्रदर्शन भरवून साजरा करण्यात आला. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दि.15 ऑक्टोबर हा जन्मदिवस सन 2015 पासून भारत सरकारने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये प्रा. विजयकुमार पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची संपुर्ण जिवन गाथा सांगुन त्यांच्या आयुष्यात असलेले वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक बाळबोध व मोठ्या व्यक्तीस विचार करावयास भाग पाडणा-या प्रश्नांना समर्पक उदाहरणांसह उत्तरे दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, मविप्रचे शिक्षणधिकारी सी. डी. शिंदे व विश्वास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरी कुलकर्णी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रंथप्रदर्शनाच्या लाभ शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांनी घेतला. प्रदर्शनात बाल वाड्:मय, चरीत्रे, कथा-कादंबरी, कविता, माहितीपर पुस्तके मांडण्यात आली होती.

‘ग्रंथ तुमच्या दारी-बालविभाग’ मंगळवार, दि.25/10/2016)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सैा. रुचा मालपाणी-इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर यांचा सहकार्याने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध 16 शाळांना ग्रंथ तुमच्या दारी-बालविभाग या योजने अंतर्गत ग्रंथपेट्या भेट देण्यात आल्या. इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर यांनी ‘ए हॉपी स्कुल प्रोजेक्ट 2016-2017’ अंतर्गत संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा दतक घेतल्या आहेत. सदर शाळेमध्ये ग्रंथालय नसल्याने आपल्या संस्थेच्या ग्रंथ तुमच्या दारी-बाल विभाग योजनेतुन इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर यांच्या सहकार्याने संगमनेर तालुक्यातील एकुण 16 शाळेना ग्रंथपेट्या देण्यात आल्या.

आधारतिर्थ आश्रमास ग्रंथपेटी भेट (शनिवार, दि.24/12/2016)

सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री.सचिन देशमुख यांचे सहकार्याने आधारतिर्थ आश्रम (महाराष्ट्रातील आताम्हात्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे) मु. तुपादेवी पो. अंजेनेरी ता. त्र्यंबकेश्‍वर येथील आश्रमास ग्रंथपेटी भेट देण्यात आली. या प्रसंगी बोलतांना ग्रंथ तुमच्या दारी-बाल विभाग योजनेचे समन्वयक विनायक रानडे यांनी सांगितले की, ग्रंथ संपदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि तीचा उपयोग करणे गरजेचे आहे परंतु वाचनाची आवड नसेल तर त्याचा उपयोग नाही आणि ग्रंथ उपलब्ध नसतील तर वाचनाची आवड असून उपयोग नाही. अशा दोन्ही गोष्टी विचारात घेऊन लहानपणापासुनच मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी संस्थेचा हा प्रयत्न आहे. श्री. सचिन देशमुख यांनी दिलेल्या या पुस्तकांच्या भेटीमुळे आताम्हात्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना यापुढील आयुष्य जगतांना अवांतर वाचनामुळे व्यवहारज्ञान व संकटाच्या वेळेस धैर्याने सामोरे जाण्याचे बळ मिळेल.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेला ग्रंथपेटी भेट

(मंगळवार, दि.24/01/2017)
सारस्वत को-ऑप बँक लि., विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने व रोटरी क्लब ऑफ अंबड नाशिक यांचे सहकार्याने इगतपुरी तालुक्यातील नांदगाव या ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेला ग्रंथ तुमच्या दारी-बाल विभाग योजने अंतर्गत ग्रंथपेटी उपलब्ध करुन देण्यात आली. ग्रामीण भगातील मुलांपर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम श्री.विनायक रानडे हे विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट्, नाशिक या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने करीत असून आपल्या दारात आलेल्या या गंगेचा उपयोग करुन आपण वेगवेगळ्या क्षेत्रात नावलैाकिक प्राप्त करावा. व ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहतील हे दाखवावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अंबड नाशिकचे श्री. डी.एस. देशमुख यांनी याप्रसंगी बोलतांना केले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अंबड नाशिकचे श्री. डी.एस. देशमुख, श्री. सुभाष गायकर, शाळेचे मुख्यध्यापक श्री. महेश गायकवाड व ग्रंथ तुमच्या दारी-बाल विभाग योजनेचे समन्वयक श्री. विनायक रानडे हे उपस्थित होते.

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com