युवा विकास

Yuva Vikas युवा हा देशाचा कणा आहे. जागतिक स्पर्धेत देशाचे स्थान टिकविण्यासाठी युवांचा हातभार महत्वाचा आहे. अशा परिस्थितीमध्ये युवांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्या ऊर्जेचा उपयोग समाजहितासाठी करून घेणे व आजचा युवा भरकटणार नाही याची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. म्हणूनच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प हातात घेऊन त्याद्वारे युवांना स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरित केले जाते. एक सक्षम व सुजाण नागरिक घडविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

जागतिक योगदिन

बुधवार, दि.21/06/2017

योगाभ्यास हा चैतन्यमय जगण्यासाठी प्रभावी मार्ग असून मनाच्या आनंदी व शुद्धतेसाठी सकारात्मक विचारांसाठी निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे. रोजच्या जीवनशैलीत त्याचा अंगीकार केल्यास मन प्रसन्न होण्यास निश्‍चितच मदत होते. त्यासाठी प्रत्येकाने योगा समजून घेऊन त्याचा स्विकार करावा. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध योगपंडीत पिराजी नरवडे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिनानिमित्त विश्वास को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या संकल्पनेतून सामुहिक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. नरवडे म्हणाले की, ओमकाराची साधना आणि प्राणायामातून शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते आणि त्यातून मनोबल वाढते. निरामय व निरोगी जीवनाचा योगा हा प्रभावी मंत्र आहे. योगसाधना ही शारीरिक, मानसिक स्थैर्य देणारी शक्ती आहे. प्राणायामातून श्‍वासावर नियंत्रण तर होतेच त्याचबरोबर एकाग्रता, चिंतनाची शक्ती विकसित होते. यावेळी त्यांनी शवासन, ताडासन, वृक्षासन, वक्रासन, कपालभाती, श्‍वसासन, प्राणायाम, त्रिकोणासन इत्यादी आसने उपस्थितांकडून करून घेतले आणि आसनांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. या सामुहिक योग साधनेसाठी मोठ्या प्रमाणावर साधक उपस्थित होते.

स्वातंत्र्य ज्योत रॅली

सोमवार, दि. 14/08/2017

भारतीय स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील देशविकासासाठी घडवण्यासाठी प्रेरणा देणारा दिवस असून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा अभिमान दिवस आहे. लोकशाही मूल्ये जोपासू व भारताला महासत्ता बनवू असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 71व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘युवा स्वतंत्रता ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 7.00 वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड येथून रॅलीला प्रारंभ झाला. गंगापूरनाका, के.टी.एच.एम. महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, हुतात्मा स्मारक सीबीएस येथे रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी मा. विश्वास ठाकूर यांनी संविधानाचे सामुहिक वाचन केले व मार्गदर्शन केले. भारतमातेच्या वेशातील मुलगी सजविलेल्या रथात विराजमान झालेली होती.

यावेळी उपस्थित युवकांनी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. रॅलीत नामदेव महाराज संस्था, सिंहगर्जना ढोल पथक, व्ही.एन. नाईक महाविद्यालय, छात्रभारती, एच.पी.टी. महाविद्यालय, भोसला मिलीटरी महाविद्यालय, शिवराय ढोल पथक, ज्ञान अमृत बहुउद्देशीय संस्था अशा अनेक संस्थांनी व अमर भागवत, सुनील जगताप, योगेश कापसे, मंदार ठाकूर, प्रितम भामरे, शौनक गायधनी, विद्यासागर घुगे, भूषण काळे, कैलास सुर्यवंशी, पवन माळवे अशा अनेक युवकांनी सहभाग नोंदविला.

‘विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता’ शिक्षणकट्टा’ उपक‘मांतर्गत समुहचर्चेचे आयोजन

शुक्रवार, दि.29/11/2013
शिक्षण व्यवस्थेतील प्रगतीशील बदलांची व्यापक पातळीवर चर्चा व्हावी, विचारमंथन व्हावे तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधणे या उद्देशाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता’ या विषयावरील समुहचर्चेचे आयोजन नवरचना विद्यालय, गंगापूर रोड, नाशिक येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्‍वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि. नाशिकच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. याचर्चेत निवृत्त शिक्षक व साहित्यिक नरेश महाजन, नवरचना विद्यालयाचे मुख्यध्यापक किशोर पालखेडकर, क्रीडा शिक्षक सुनील गायकवाड, शिक्षिका पुष्पा चोपडे सहभागी झाल्या. यावेळेस विद्यार्थी व विद्यार्थींनींनी वक्त्यांना विविध प्रश्‍न विचारुन आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

मैत्री आकाशाशी’ ‘सृजन’ उपक्रमांतर्गत स्लाईड शोसह व्याख्यान

दि.10/12/13
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण व्हावी, विज्ञानातील बदलत्या शोध व संशोधनाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने ‘सृजन’ उपक्रमांतर्गत ‘मैत्री आकाशाशी’ या विषयावर स्लाईड शोसह व्याख्यान एकलव्य निवासी स्कूल, पेठ रोड, नाशिक येथे संपन्न झाले. विश्वाच्या अंतरंगात दडलेल्या अद्भूत आणि माहितीपूर्ण ज्ञानाचा खजिना खगोलशास्त्राचे अभ्यासक रमाकांत देशपांडे यांनी उलगडून दाखविला. विश्वाचा शोध, निर्मिती, आकाशगंगा, सूर्यग्रहण, मंगळावरील जीवसृष्टी, गुरुत्वाकर्षण, तारा तुटणे म्हणजे काय? अशी अनेकविध उत्तरे स्लाईड शोसह व्याख्यानातून सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली आणि खर्‍या अर्थाने मुलांची ‘आकाशाशी मैत्री’ झाली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, रेडिओ विश्वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागर अभ्यासाचा’ व ‘सृजनशील पालक’ या विषयावर कार्यशाळा ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमातर्गत दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

शनिवार, दि.11/01/14 व रविवार, दि.12/01/14
विद्यार्थ्यांमधील उपजत कौशल्याला दिशा मिळावी व त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘जागर अभ्यासाचा’ व ‘सृजनशील पालक’ या विषयावरील दोन दिव्तीय कार्यशाळचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण विभागीय केंद्र-नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, सृजन कन्सल्ट्ंट, रेडिओ विश्‍वास 90.8 व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेस सृजन कन्सलटन्टचे शंतनु गुणे, पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे दीपक गुप्ते, ज्योती केमकर यांनी मार्गदर्शन केले. यात वाचन, नोट्स लिहिणे, ध्येय निश्‍चिती, वेळापत्रक, अभ्यासाच्या विविध पद्धती, स्मरणशक्ती, बहुआयामी बुद्धिमत्ता, स्वतःतील क्षमता जाणणे, उत्तम असा ध्यास या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालक संवादाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस चाळीसहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा शनिवार, दि.25/01/2014 उत्तम वक्ता होण्यासाठी चौफेर दृष्टी, समाजातील बदलत्या घटनांचे निरीक्षण, अवलोकन, विविध विषयांवरील वाचन, तीक्ष्ण संवेदनशक्ती त्याचबरोबर आपले म्हणणे प्रखरपणे पटवून देण्याची हातोटी, देहबोली या मूलभूत गुणांची गरज आहे. यासाठी वक्तृत्व स्पर्धा मार्गदर्शक ठरतात.

विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, तिडके कॉलनी, नाशिक येथे करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता 5वी ते 7वीच्या गटात सिद्धी देशपांडे प्रथम, पुष्कर भालेराव द्वितीय व साक्षी पुजारी हिने तृतीय क्रमांक पटकावला.

इयत्ता 8वी ते 10वीच्या गटात आदिनाथ चौधरी प्रथम, ज्ञानदा र कुलकर्णी द्वितीय व प्रिया जैन हिने तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन गटात मुग्धा जोशी प्रथम, श्वेता भामरे द्वितीय व विवेक चित्ते याने तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी स्पर्धकांस प्रशस्तीपत्रे देण्यात आली. स्पर्धेत 150हून अधिक विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

दिशा दहावी नंतरची’ कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, सृजन कन्सलटन्टस् नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘दिशा दहावी नंतरची’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाली. कार्यशाळेत सृजन कन्सल्टंटचे शंतनु गुणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास करण्यातील क्षमतांचा योग्य विचार करून करिअर घडवण्यासाठी दिशा ठरवावी. आपल्याला ज्या विषयात गती, आवड व आत्मविश्वास आहे त्यातून निश्‍चितच यशप्राप्ती होत असते. आजच्या स्पर्धेच्या काळात विविध क्षेत्रात संधी निर्माण झाल्या आहेत त्याची निवड करून विद्याशाखा निवडावी. बहुतेकदा आपल्या सोबतचा मित्र इंजिनिअरिंगला जातो म्हणून आपणही जावे ही मानसिकता धोकादायक ठरू शकते. माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान, वैद्यकीय, बँकिंग अशा क्षेत्रातील संधी युवकांना दिशा देत आहेत. अभ्यासातील सातत्य, एकाग्रता ही यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे. अवांतर वाचन, आवडीच्या विषयांविषयी माहिती जाणून घेणे इत्यादी गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. यावेळी शंतनु गुणे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील उपजत कौशल्याला दिशा मिळावी व त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

क्षमता संवर्धन’ कार्यशाळा- ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन

मुलांमधील सुप्त गुणांची ओळख करून देण्यासाठी त्यांना आवडीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यांच्यातील बहुआयामी बुद्धीमत्तेचा शोध घेण्यासाठी विविध प्रोजेक्टमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे, त्यातूनच मुलांच्या गुणवत्तेचा शोध घेता येतो. विद्यार्थ्यांमधील उपजत कौशल्याला दिशा मिळावी व त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सृजन कन्सलटन्टस् नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘क्षमता संवर्धन’ या विषयावरील ही कार्यशाळा प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाली.

‘करिअरच्या दिशा’ या विषयावर व्याख्यान

मार्गदर्शक – सुप्रसिद्ध समुपदेशक डॉ.अशोक चोपडे (पुणे)
पाल्याची मूलभूत आवड लक्षात घेऊन त्याला ज्या क्षेत्रात गती आहे अशा क्षेत्रात करिअर करण्याची संधी द्यावी त्यातून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, पाल्याच्या जगण्याच्या गरजा त्याच्या मनासारख्या क्षेत्राने निर्माण होतात त्याकडे पालकांनी लक्ष द्यावे याकरीता सुप्रसिद्ध समुपदेशक डॉ.अशोक चोपडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, उत्क्रांती प्रतिष्ठान नाशिक, पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमातर्गत ‘करिअरच्या दिशा’ या विषयावरील डॉ. अशोक चोपडे यांचे व्या‘यान प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाले. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक संधी निर्माण झाल्या असून पाल्यांच्या परीक्षेतील गुणांकडे लक्ष देण्याअगोदर त्याची मानसिकता समजून घ्या, त्याच्यातील कौशल्याची जाणीव करून द्या. भौतिक सुखाकडे जाण्याचा प्रवास जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्याच्यातील चांगला माणूस घडवणे हीदेखील प्रक्रिया शिक्षणातून निर्माण होत असते. कुठलेही क्षेत्र अवघड नसून कष्ट व मेहनत करणे हीच यशस्वी करिअरची गुरुकिल्ली आहे. चौफेर वाचन व ज्ञानाविषयीच्या कुतुहलाची जोपासना विद्यार्थ्यांनी करावी असे मार्गदर्शन डॉ.चोपडे यांनी केले.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर व्याख्यान

मार्गदर्शक – संजीव भामरे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, अनुभूती फाऊंडेशन नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झालेल्या ‘सॉफ्टवेअर क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावरील व्याख्यानात संजीव भामरे यांनी मार्गदर्शन केले. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन संधी येत असून आज कुठल्याही क्षेत्रात सॉफ्टवेअर करिअर ही महत्त्वपूर्ण गरज होत आहे. बँकिंग, मोबाईल, मनोरंजन, आरोग्य या क्षेत्रातील सॉफ्टवेअरची गरज ही कौशल्यपूर्ण आणि व्यवसायाभिमुख नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरली आहे. त्यासाठी यातून विकासाची नवी सामाजिक जाणिवही विस्तारत आहे असे प्रतिपादन टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसमधून निवृत्त झालेले संजीव भामरे यांनी केले. सॉफ्टवेअर क्षेत्रात इंजिनिअर, प्रोग्राम अॅनालिस्ट, सपोर्ट स्पेशालिस्ट, डाटाबेस प्रोग्रामर, ग्राफिक्स डिझायनर अशी अनेक स्वतंत्र क्षेत्र उपलब्ध आहेत त्यातून नवीन शोधातून सर्वसामान्यांपर्यंत माहिती तंत्रज्ञानाचे युग अवतरले आहे.

संगणक साक्षरता ही मूलभूत गरज ठरली आहे त्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी या क्षेत्रात यावे. परदेशात जाण्याची संधी उपलब्ध असण्याबरोबरच आर्थिक उलाढाल या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. शालेय व विद्यापीठ पातळीवर जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख शिक्षण आभ्यासक्रमाचा समावेश करावा असेही श्री. भामरे पुढे म्हणाले. यावेळी सॉफ्टवेअर इंजिनिअर महेश रसाळ यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजेश हिवरे यांनी केले. याप्रसंगी गणेश ओतूरकर, ज्योत्स्ना रांगणेकर, धनंजय जोशी, देवांग गुंजाळ, नमिता वाणी, अनिल सानप तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंजिनिअरिंगमधील करिअर संधी व करिअर निवडीची पद्धत या विषयावर व्याख्यान

मार्गदर्शक – संजीव भामरे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, अनुभूती फाऊंडेशन नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झालेल्या ‘इंजिनिअरिंगमधील करिअर संधी व करिअर निवडीची पद्धत’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर व्याख्यानात संजीव भामरे यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, आजच्या काळाची गरज असलेल्या प्रिंटींग, रोबोटिक, मेकॅट्रोनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन या क्षेत्रातील संधी या आव्हानात्मक तर आहेच त्याचबरोबर आजच्या काळाची मागणी असलेल्या आहेत. मरिन इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी विद्याशाखांतून महत्त्वपूर्ण संधी समोर येत आहेत. आधुनिक ज्ञानाची कवाडे यामुळे खुली झाली आहेत. भारताबरोबरच परदेशातही भारतीय तरुणांना इंजिनिअरिंग कंपन्यांमध्ये मागणी आहे, ग्लोबल संधी उपलब्ध झाली आहे.

जागर अभ्यासाचा’ कार्यशाळा

मार्गदर्शक – शंतनु गुणे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सृजन कन्सलटन्टस् नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘जागर अभ्यासाचा’ या विषयावरील तीन कार्यशाळा शंतनु गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाल्या.

कार्यशाळा 1 – काळाच्या ओघात पुस्तकांची जाडी वाढली आहे, शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढली आणि त्यातूनच पालकांमध्येही मुलांविषयी उत्सुकता असल्या तरी त्यातूनच मुलांवर तणाव वाढला, परीक्षा पद्धतीविषयी भीती वाढली. यावर साधासोपा उपाय म्हणजे प्रभावी व लक्षपूर्वक अभ्यास होय. शिक्षण पद्धतीत अभ्यासाविषयक दृष्टिकोन हा मार्कांभावती फिरत असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला खीळ बसत असते, असे प्रतिपादन सृजन कन्सलटन्टचे शंतनू गुणे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सृजन कन्सलटन्टस् नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘जागर अभ्यासाचा’ या विषयावरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सदर कार्यशाळा प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाली. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी सकारात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी शिक्षक व पालकांनी महत्वाची भुमिका निभवावी, विविध खेळ, सुसंवाद यातून हे साध्य होऊ शकते. अभ्यास म्हणजे काय व तो कसा करावा यावर मुद्देसुद व सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांचा अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडून येऊ शकते हे शंतनु गुणे यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या अभ्यासाची जबाबदारी स्वतः घेणे व त्यातून गुणवत्ता वाढीसाठी यश मिळू शकते.

कार्यशाळा 2 – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सृजन कन्सलटन्टस् नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘जागर अभ्यासाचा’ या विषयावरील कार्यशाळा शंतनु गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाली. अभ्यास म्हणजे काय? प्रभावी अभ्यास म्हणजे काय? या प्रश्‍नांची उत्तरे कृतीद्वारे व चर्चेद्वारे शंतनु गुणे यांनी करून घेतली. अभ्यास व उत्तम गुणवत्तेचे नाते म्हणजे काय? हे त्यांनी विविध प्रयोगातून समजावून सांगितले. उत्तम अभ्यास कधी होतो, त्यासाठी चंचल मनाला कसे शांत करायचे, एकाग‘ता कशी वाढवावी याची सोपी व प्रभावी तंत्रे त्यांनी समजावून सांगितली. याचबरोबर अभ्यासाचे नियोजन कसे करावे, अभ्यासामध्ये आपण कुठे आहोत हे समजून घेण्याबरोबरच अभ्यासाचे नियोजन कसे करावे याच्या महत्त्वपूर्ण टिप्सही शंतनु गुणे यांनी दिल्या. त्यानंतर गोल सेटींग आणि स्मार्ट अॅक्शन प्लॅन या संकल्पना खेळातून समजावून सांगितल्या. या कार्यशाळेत महत्त्वाचा आणखी एक भाग म्हणजे पालक सभा होय. दिवसभरात विद्यार्थ्यांना जे जे शिकवले ते पालकांपर्यंत पोहोचवले गेले व त्यांच्याही शंकांचे निरसन केले गेले.

कार्यशाळा 3 – आजच्या आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना ज्ञानाविषयी अपडेट राहण्याच्या संधी आहेत त्यातून त्यांच्यातील मुलभूत ज्ञानाला दिशा मिळत असते. ज्ञानाची जोपासना करताना विद्यार्थी-शिक्षक सुसंवाद ही महत्त्वाची गरज असते. त्यातून निश्‍चित दिशा व जाणीव विकसित होत असते, असे प्रतिपादन सृजन कन्सलटन्टचे शंतनू गुणे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सृजन कन्सलटन्टस् नाशिक, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट वरेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘जागर अभ्यासाचा’ या विषयावरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आजच्या व्यावसायिक शिक्षण पद्धतीमध्ये उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण सुद्धा दुरापास्त होत चाललेले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटक शिक्षणापासून वंचित होत आहे. त्यातच लहान घरात शांतपणे अभ्यास करण्याची सोय नसल्याने अशा कुटुंबातील विद्यार्थी मागे राहात आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या खास मागास व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका संस्था चालवित आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांद्वांरे यश संपादन करून, इतर व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून समाजातील मुख्य धारेत आपले भक्कम स्थान निर्माण करावे हा अभ्यासिकेमागील संस्थेचा उद्देश आहे. अभ्यासिकेत अभ्यासासाठी शांत व पोषक वातावरण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे. स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते ग्रंथ, नियतकालिके उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर इंटरनेटद्वारा माहिती व संदर्भसेवेबरोबरच झेरॉक्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 31 मार्च 2016 अखेर नियमित अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 350 आहे.

जाणीव सामाजिकतेची’ उपक्रम

रेडिओ विश्वास 90.8 मार्फत जाणीव सामाजिकतेची हा उपक्रम 1 जानेवारी 2015 पासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये नाशिक शहरातील काही निवडक सामाजिक/ शैक्षणिक संस्थांबरोबर विविध विषयांवर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातुन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हा विषय मुख्यत: केंद्रित केला जातो. वंचित, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राथमिक शिक्षण मिळाले तर त्यांचा शिक्षणासंदर्भातील दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होते व शिक्षणाविषयी ओढ निर्माण होऊ न त्यांचे भवितव्य उज्ज्वल घडू शकते. यांसाठी या विषयावर संवेदनशीलतेने काम करण्याची गरज लक्षात घेऊन रेडिओ विश्वास 90.8 या समुदाय रेडिओतर्फे ‘जाणीव सामाजिकतेची’ उपक्रमाचे माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. यानुसार संबंधित संस्थांना रेडिओ विश्वास 90.8 च्या माध्यमातून रेडिओची महिती, उपकरणे, कार्यक्रम निर्मिती प्रक्रिया, इ. बाबतची माहिती प्रात्यक्षिकांद्बारे देऊन रेडिओ विश्वास व संबंधित संस्थांद्वारे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्यात येत आहे. या कार्याक्रमाद्वारे संबंधित संस्था/ गटाशी निगडित प्रश्न, कार्यपद्धती, विविधता, नावीन्यता, इत्यादींबाबत कार्यक्रम निर्मिती करून सदर माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व याद्बारे वंचित, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आत्मविश्‍वास वाढविण्याचा रेडिओ विश्वासचा मानस आहे. आजपर्यंत या कार्यक्रम अनेक शाळांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमातून अनेक विद्यार्थांचे कलागुण आणि विविध पैलू समोर येण्यास मदत झाली. या शिवाय त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ झाली. मुलांनीच सांगितलेल्या कथा, कविता, किंवा सुविचार, इत्यादी गोष्टींना या कार्यक्रमात स्थान देण्यात आले.

जागर मनाचा – शंतनु गुणे

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी सकारात्मक जाणीव निर्माण व्हावी यासाठी शिक्षक व पालकांनी महत्त्वाची भूमिका निभवावी. अनेक क्रीडा प्रकार व संवादातून हे साध्य होऊ शकते. अभ्यास म्हणजे काय व तो कशा पद्धतीने करावा यावर मुद्देसूद व सोप्या तर्‍हेने मार्गदर्शन करून त्यांचा अभ्यास करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडून येऊ शकते असे प्रतिपादन मार्गदर्शक शंतनु गुणे यांनी केले. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, सृजन कन्सल्टन्टस्, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर मनाचा या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

दिशा शैक्षणिक उपक्रम

दिशा शैक्षणिक उपक्रम आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने श्रीमती सुधा मेहता व त्यांचे सहकारी यांनी चालविलेला दिशा शैक्षणिक उपक्रमाचे हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. श्रमिक, कष्टकरी व मजूर कुटुंबातील, विशेषत: आनंदवली व परिसरातील निम्न मध्यमवर्गीय व आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित घटकातील मुले-मुली यांचेमध्ये शिक्षणाविषयी जाणीव जागृती व्हावी, त्यांनी त्यांचे औपचारिक शालेय शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी प्रेरित व्हावे अशा उद्देशाने सदर उपक्रम अविरतपणे सुरू आहे. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक आणि विश्वास को- ऑप. बँक लि. यांचे तर्फे सदर उपक्रम सफल होणेसाठी विविध स्तरावर मदत केली जाते. बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर स्वत: दिशा शैक्षणिक उपक्रमात सातत्याने सहभाग घेऊन मार्गदर्शन करत असतात. इयत्ता 1 ली ते 10 वी चे वर्ग या उपक्रमाअंतर्गत चालविले जातात. हे वर्ग चालविणेकरिता सामाजिक कामाची आवड असणारी अनुभवी शिक्षक मंडळी म्हणून कल्पना ओहोळ, संगीता कुलकर्णी, दीप्ती, प्रीती, रेखा, कोमल, स्नेहल कुलकर्णी व सुधा मेहता, आदी परिश्रम घेतात. आतापर्यंत पाचशेचे वर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सदर उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे. याच उपक्रमात शिकलेल्या रेखा व कोमल या विद्यार्थिंनी आता शिकविण्याचे काम करतात ही दिशा शैक्षणिक उपक्रमाची उपलब्धी आहे. तसेच या उपक्रमाचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने प्रयत्नशील आहेत, तर काही विद्यार्थी नोकरी मिळविण्यात यशस्वी ठरलेले आहेत.

याच प्रकारचे उपक्रम नाशिकमधील विविध भागांमध्ये सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे. जेणे करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल व खाजगी क्लासेसची फी न भरू शकणाऱ्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण प्राप्त होईल. हा नावीन्यपूर्ण उपक्रम चालविणे ही मात्र दिशा शैक्षणिक उपक्रम किंवा विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, सदर उपक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा वाटा आम्ही उचलला आहे. या निर्मळ भावनेतून मागील आठ वर्षापासून हे प्रयत्न अविरतपणे सुरू आहेत. सदर उपक्रमाची माहिती देणारा जमिनीवरचे तारे हा माहितीपट तयार करण्यात आला आहे.

दिशा दहावीनंतरची कार्यशाळा – शंतनु गुणे

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, सृजन कन्सल्टन्टस्, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिशा दहावीनंतरची’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांना सृजन कन्सल्टंटचे शंतनु गुणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास करण्यातील क्षमतांचा योग्य विचार करून करिअर घडवण्यासाठी दिशा ठरवावी. आपल्याला ज्या विषयात गती, आवड व आत्मविश्वास आहे त्यातून निश्‍चितच यशप्राप्ती होत असते. आजच्या स्पर्धेच्या काळात विविध क्षेत्रात संधी निर्माण झाल्या आहेत त्याची निवड करून विद्याशाखा निवडावी. माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान, वैद्यकीय, बँकिंग अशा क्षेत्रातील संधी युवकांना दिशा देत आहेत. अवांतर वाचन, आवडीच्या विषयांविषयी माहिती जाणून घेणे, इत्यादी गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमधील उपजत कौशल्याला दिशा मिळावी व त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

मुलांच्या अंगी असलेल्या टॅलेंटची जोपासना’ व्याख्यान

मार्गदर्शक – संजीव भामरे
विद्यार्थ्यांमधील टॅलेंटची जोपासना करण्यासाठी पालकांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे विचार करू द्यावा. बदलते भाषिक पर्यावरण, माहिती व तंत्रज्ञान, शिक्षणाची भाषा व रोजच्या व्यवहारातली भाषा, जगण्यातील रोजचे अनुभव यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. गतिमान जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांच्या आवडी इतक्याच करिअरच्याही संधी निर्माण होत आहेत. त्यासाठी पालकांनी त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याचे काम करावे, याकरीता संस्थेतर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, अनुभूती फाऊंडेशन, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमांतर्गत ‘मुलांच्या अंगी असलेल्या टॅलेंटची जोपासना’ या विषयावर प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित व्या‘यान संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शक संजीव भामरे म्हणाले की, साहित्य, कला अशा क्षेत्रातील मुलांचा कल त्यांच्या मानसिकतेला बळ देत असतो. गणित, इंग्रजीसारखे विषय हसत खेळत व मनोरंजनाच्या माध्यमातून शिकवल्यास त्यांच्यात आवड निर्माण होते. शाळेतल्या शिक्षणाबरोबरच निसर्गातील शिक्षणही त्यांच्यासाठी आनंददायी आहे. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे न लादता सुसंवाद व समजून घेण्याची प्रक्रिया वेगाने करण्याची गरज आहे. यावेळी श्री. भामरे यांनी शिक्षण व भाषा, पालक विद्यार्थी सुसंवाद अशा अनेक विषयांवर चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले व पालकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महेश रसाळ यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

‘कॅम्पस मैत्र कारवाँ प्रशिक्षण’

सोमवार, दि.21/11/2016
विषय – युवा प्रशिक्षण ‘जेंडर इक्वॅलिटी’
सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुखदेव माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, इंदिरा नगर, नाशिक’ येथे संस्थेच्या अनिता पगारे व टिम यांनी ‘जेंडर व इक्वॅलिटी’ य विषयावर प्रशिक्षण घेतले.

प्रथम राजेश हिवरे यांनी सर्वांना हलक फुलकं वाटावं, सर्व समान पातळीवर यावेत व स्वयंसेवक आणी विद्यार्थी यांच्यात एकरुपता यावी यासाठी आईस बँकिंगचा खेळ घेण्यात आला. ज्यात त्यांनी एका गाण्यावर सर्वांना नाच करण्यास सांगितले. तसेच पुनर्जन्म घ्यायची संधी मिळाली तर कोणता जन्म घ्याल? स्वतचे नाव काय ठेवाल? हा खेळ घेतला. यात मुलांचे जन्म मुलींच्या जन्मापेक्षा जास्त होते यावर राजेश यांनी मांडणी केली. यानंतर सर्व टिमने मिळून फुगे आणी टाचणी हा खेळ घेतला. त्यावर सर्वांचे विचार एकूण घेतले आणी मग अनिताने सिमोन दि बुवायर यांचा सामाजिक लिंगभाव सिद्धांत मांडला. ज्यात स्त्री पुरुष कसे समाजात विविध मार्गाने घडविले जातात यावर चर्चा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थी विविध विषयांवरच्या गटागटामध्ये विभागले गेले. ती गटे व मार्गदर्शक खालीलप्रमाणे,

1) क्राईम- दिपक देसले, पोलिस उपनिरिक्षक, सायबर क्राईम, पोलिस आयुक्तालय, नाशिक
2) व्यसन- विजय रिंढे, मानस व्यसनमुक्ती केंद्र, नाशिक आणी किरण कांबळे
3) जोडीदाराची निवड- पूनम गायकवाड, सागर नागरे, संकेत सोनवणे
4) दिल-दोस्ती-दुनियादारी- शारदा देवकर, जयंत बोरीचा, आकाश कांबळे
5) छेडछाड- राजेश हिवरे, श्रद्धा कापडणीस, श्वेता पटेकर

गटात त्या त्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थी त्यांचा विषय पुढे कसा नेतील इतर विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहचवतील यावरही चर्चा झाली. शेवटी सर्वांना एकत्र करुन अ रिस्पेक्ट ग्रुपचा संकल्पना नृत्य सादर करण्यात आले. व सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रशिक्षणास 300 विद्यार्थी उपस्थित होते.

‘किशोरवयीन मुलींची बैठक’
बुधवार, दि.23/11/2016
ठिकाण – लोकनिर्णय सामाजिक संस्था, पेठरोड, नाशिक
वक्ते – संस्थेचे स्वयंसेवक व अनिता पगारे
सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनिर्णय सामाजिक संस्था, पेठरोड, नाशिक येथे किशोरवयीन मुली व महिला यांच्याकरीता ‘मासिक पाळी व मुलींचे आरोग्य’ या विषयावर संस्थेच्या अनिता पगारे व स्वयंसेवकांची टिम यांनी प्रशिक्षण घेतले.

या प्रशिक्षणात किशोरवयात शरीरात होणारे बद्दल व मासिकपाळी म्हणजे काय? का येते? कशी येते? व त्यासंदर्भातील सामाजिक समज-गैरसमज आणी त्याबाबत घ्यावयाची काळजी इ. विषयाचे प्रबोधन करण्यात आले. या प्रशिक्षणात उपस्थित मुलींनी प्रशिक्षकांना या बाबत विविध प्रश्न विचारुन मनातील शंकाचे निवारण करुन घेतले. फुलेनगर, पेठरोड, पंचवटी येथील वस्तीतील 40 मुली व महिला या प्रसंगी उपस्थित होत्या.

गुरुवार, दि.08/12/2016
विषय – युवा प्रशिक्षण ‘जेंडर इक्वॅलिटी’
सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने एस.बी कॉलेज, शहापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जेंडर इक्वॅलिटी’ या विषयावर संस्थेच्या अनिता पगारे व स्वयंसेवकांची टिम यांनी प्रशिक्षण घेतले.

ठाणे जिल्ह्यातील एस.बी कॉलेज, शहापूर येथे सकाळी 10 वाजता प्रशिक्षणास सुरुवात झाली. उद्घाटन प्राचार्य फुलझेले सर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख तसेच विशाखा कमिटीच्या प्रमुख गोरे मॅडम यांनी केले. शिबिरच्या पहिल्या सत्रात मैत्र कारवाची संकल्पना व त्याअंतर्गत काय कर्यक्रम होतात याची माहिती विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. शिबिराचे वातवरण तयार व्हावे स्वयंसेवक व शिबिरार्थी यांची ओळख वाढावी याकरीता स्वतची ओळख करुन देण्याचा खेळ घेण्यात आला. यात ओळख करुन देतांना आईचे नाव कोणीच वापरत नाही किंवा जाणीवपुर्वक उल्लेखनीय टाळतात असा मुददा पुढे आला. यावर चर्चा होऊन आई वडीलांचे साम्य याची यादी तयार झाली. आई म्हणजे कोमल, प्रेमळ, शांत सर्वांना समजून घेणारी आणी वडील म्हणजे रागीट, कणखर असा फरक मांडण्यात आला. व त्यावर चर्चा होऊन ब-याच विद्यार्थ्यांनी निसर्गतच हे फरक असतात असे मत मांडले.

दुस-या सत्रात स्त्री-पुरुषामधील निसर्गनिर्मीत आणि मानवनिर्मित फरक समजावून घेण्यासाठी फुगे आणि टाचणीचा खेळ घेण्यात आला. पुढे सिमोन दि बुवायार यांचा ‘जेंडर सोशल कन्स्ट्रक्शन’ हा सिध्दांत मांडला यात प्रथम सेक्स आणि जेंडर यातील फरक समजावून देण्यात आला प्रत्येक मुलीला स्त्री होईपर्यंतचा आणि प्रत्येक मुलाला पुरुष होईपर्यंतचा प्रवास कसा घडविला जातो
कळत नकळत विषमता कशी पेरली जाते. कपडे, शिक्षण, स्त्रीच्या टिपीकल प्रतिमा स्त्री जन्मताच रडकी, प्रेमळ, समजूतदार, नाजूक इ. नसते तर तिला घडविले जाते. पुरुष जन्मताच रागीट, धडधाकट, मारणारा नसतो तर त्याला घडविले जाते हा सिध्दांत समजावून सांगितला. या प्रशिक्षणास कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विषय – युवा प्रशिक्षण ‘जेंडर इक्वॅलिटी’
सोमवार, दि.09/01/2017 वेळ – सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
ठिकाण – जे.एम.सी.टी कॉलेज, वडाळा रोड, नाशिक
प्रशिक्षक – संस्थेचे स्वयंसेवक 1)कल्याणी ए.एम. 2) किरण कांबळे 3) जयंत बोरीचा 4) अनिता पगारे 5) राजेश हिवरे 6) प्राजक्ता घोलप 7) शितल पवार 8) पूनम गायकवाड 9) शारदा देवकर 10) श्‍वेता पटेकर 11) रेहान शेख 12) संकेत सोनवणे 13) श्रद्धा कापडणे 14) रोशन बोराडे 15) अक्षय भामरे 16) शुभम वाघ 17) युवराज्ञी माणिक
सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने जे.एम.सी.टी. पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा, नाशिक येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जेंडर इक्वॅलिटी’ या विषयावर संस्थेच्या अनिता पगारे व स्वयंसेवकांची टिम यांनी प्रशिक्षण घेतले.

विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या स्वयंसेवकांच्या टिमने सकाळी 9.30 वाजता आईस बँकिंग या खेळाद्वारे सुरुवात केली. यात कॉलेजकडून तृतीय वर्षाचे 200 विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वांना गटचर्चेसाठी 6 विभागात विभागण्यात आले.

1) सायबर क्राईम – या सत्रासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून सायबर क्राईमचे वरीष्ठ अधिकारी अमित ठाकरे सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय? कसा घडतो? आपण सोशल मिडिया वापरतांना अज्ञानापोटी कसे अडकतो? त्यावरील उपाय व कायदे त्यांनी समजून सांगितले.स्वयंसेवक प्राजक्ता घोलपने या गटाचे संचलन केले.

2) दिल-दोस्ती-दुनियादारी – आकर्षण, मैत्री आणी प्रेम म्हणजे काय? यातला फरक काय आहे? तो कसा समजून घ्यावा व अंमलात आणावा यावर गटात खूपच खेळीमेळीत चर्चा झाली. गटात सर्वच मुस्लिम होते. त्यांच्यात केला जाणारा मुलामुलींमधील भेद व त्यामुळे नात्यात जाणवत असलेला ताणतणाव विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला. त्यावर स्वयंसेवक शारदा देवकर, जयंत बोरीचा, रेहान शेख यांनी मार्गदर्शन केले.

3) व्यसनधिनता आणि व्यसनाचे दुष्परिणाम – या गट चर्चेत मैत्र कारवाचे अक्षय भामरे, संकेत सोनवणे आणि किरण कांबळे यांनी व्यसन म्हणजे काय? त्यांचे प्रकार आणि त्याचा शरीरावर व मनावर होणारा परिणाम. कुटुंबावर व समाजावर होणारे दुष्परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी खूपच गंभीरपने या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी स्वयंसेवकांनी धुम्रपानामुळे व्यसनी व्यक्तीच्या शरीरात कसे घातक द्रव्य जातात याचे बाटलीद्वारे प्रात्यक्षिक करुन दाखविले.

4) छेडछाड किंवा जितनी तेरी उतनी मेरी – या सदरात छेडछाड म्हणजे काय? त्याचे मुलींवर आणी मुलांवर होणारे परिणाम यावर खेळाच्या माध्यमातून चर्चा झाली. विद्यार्थ्यांना येणा-या आपल्या भागापासून ते कॉलेज आवारापर्यंत कुठे कुठे असुरक्षित वाटते किंवा शरीराच्या कुठल्या अवयवांना स्पर्श झाल्यास मुले मुली असुरक्षितता फिल करतात हे समजावून घेण्यासाठी प्रत्येक मुलामुलीस कार्डशिट देऊन लिहण्यास सांगितले आणि त्यातून असुरक्षित एरीया व अशा घटना ज्यात स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातो अशा घटनांची यादी तयार करण्यात आली. असे अयोग्य वर्तन कोणी केले तर काय काय उपाय करायचे यावर सविस्तर चर्चा झाली. या सत्रामुळे फक्त मुलीच नव्हे तर मुलांनाही चुकीच्या जागी स्पर्श केलेले आवडत नाही हे समजले. सदर सत्र श्रद्धा कापडणीस, रोशन आणी युवी या स्वयंसेवकांनी घेतले.

5) जोडीदाराची निवड – ह्या सदरात स्वतच्या लग्न प्रक्रियेत आपण स्वत कसे जास्तीत जास्त सहभागी होऊ शकतो त्यामुळे काय फायदे होतात. तसेच लग्न प्रक्रियेत मुलामुलींना सहभागी न केल्यामुळे कसे नुकसान होते. यावर चर्चा झाली. सदर सत्र पूनम गायकवाड, शीतल व अनिताने घेतले. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांचे गट करुन विविध खेळाच्या माध्यमातून जेंडर ची संकल्पना समजावून सांगण्यात आली. या खेळामध्ये फुगे आणि टाचणीचा खेळ घेण्यात आला आणि नंतर त्या खेळाबद्दल बोलतांना अनिता पगारे म्हणाल्या कि फुगे आणि टाचणी ही रुपक आहे. फुगे म्हणजे समाजातल्या स्त्रिया आणि टाचणी म्हणजे समाजातल्या विविध प्रकारची सत्तास्थाने. मग सहभागी विद्यार्थ्यांनी खेळानंतर मांडलेले त्यांचे अनुभव त्या त्या रुपकाशी जोडून वाचल्यानंतर आपण मुल म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून कसे सत्तेचा गैरवापर करतो यावर चर्चा झाली. सत्ता पैशांची, शारिरीक, पदाची, नावाची, प्रदेशाची, कायद्याची असू शकते. स्त्रियांच आयुष्य असेच आपण सहज, एकून न घेता, स्पर्धक समजून संपवतो याची जाणीव या खेळातून करुन दिली.

या शिबिरात ‘मैत्र कारवां’ ही संकल्पना काय आहे याची माहिती प्रास्ताविकात श्रद्धा कापडणे यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने एस.बी कॉलेज, शहापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जेंडर इक्वॅलिटी या विषयावर संस्थेच्या अनिता पगारे व स्वयंसेवकांची टिम यांनी प्रशिक्षण घेतले.

या प्रशिक्षणात स्त्री-पुरुषामधील निसर्ग निर्मीत आणि मानवनिर्मित फरक समजावून घेण्यासाठी फुगे आणि टाचणीचा खेल घेण्यात आला. पुढे सिमोन दि बुवायार यांचा जेंडर सोशल कंन्स्ट्रकशन हा सिध्दांत मांडला यात प्रथम सेक्स आणि जेंडर यातील फरक समजावून देण्यात आला प्रत्येक मुलीला स्त्री होईपर्यंतचा आणि प्रत्येक मुलाला पुरुष होईपर्यंतचा प्रवास कसा घडविला जातो कळत नकळत विषमता कशी पेरली जाते. कपडे, शिक्षण, स्त्रीच्या टिपीकल प्रतिमा स्त्री जन्मताच रडकी, प्रेमळ, समजूतदार, नाजूक इ. नसते तर तिला घडविले जाते. पुरुष जन्मताच रागीट, धडधाकट, मारणारा नसतो तर त्याला घडविले जाते हा सिध्दांत समजावून सांगितला. या प्रशिक्षणास कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विषय – युवा प्रशिक्षण :‘पुर्ण विश्व समजावून घेतांना’
मंगळवार, दि.10/01/2017 वेळ – सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत
ठिकाण – कवीवर्य टिळक वाचनालय, त्र्यंबक नाका, नाशिक
सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य टिळक वाचनालय, त्र्यंबक नाका, नाशिक येथे ‘पुर्ण विश्व समजावून घेतांना’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री रेश्मा रामचंद्र यांनी केले. कार्यशाळेस 200 युवा उपस्थित होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणी संवेदनशिल कवियत्री दिशा केणी यांनी या कार्यशाळेस संबोधित केले.

समाजात कायम विश्व हे स्त्री-पुरुषांचे आहे असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात ह्या विश्वात अनेक प्रकारच्या लैंगिक ओळख असलेले लोक राहतात. पण आपण त्यांना समजावून न घेता त्यांचा अपमान करतो किंवा असे लोक ह्या विश्‍वाचा भाग नाही असे त्यांच्याशी वागतो. त्यामुळे ज्यांची लैंगिकता वेगळी आहे त्यांना एल.जी.बी.टी.क्यु.एच.ए कम्युनिटी म्हटले जाते. त्यामुळे असे लोक आपली ओळख लपवतात. त्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला, हिंसाचाराला सामोरे जावे लागते याची मांडणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणी संवेदनशिल कवियत्री दिशा यांनी पीपीटीच्या सहाय्याने रोजच्या आयुष्यातील उदाहरणे देऊन केली. पुढे या कार्यशाळेत दिशा यांनी ट्रान्स जेंडर म्हणजे काय? त्यांचे विविध प्रकार, त्यांचे सामाजिक, राजकिय, धार्मिक, आर्थिक, लैगिंक अत्याचार या विषयावर बोलतांना सांगितले कि ट्रान्स जेंडर हा गावातील सगळ्यात शेवटाचा/खालचा समाज म्हणुन समजला जातो. त्यांना गावामध्ये कोणत्याही शुभ कार्यात सहभागी होता येत नाही व गावाच्या वेशीवर त्यांचे निवासस्थान असते अशा अनेक व्यथा ह्या समाजात जगतांना त्याना भोगाव्या लागतात. ट्रान्स जेंडरचे जीवन तसेच त्यांच्या विषयी समाजात समजले जाणारे गैरसमज यांचे निवारण त्यांनी करुन दिले.

या कार्यशाळेत एम.एस.डब्ल्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तसेच कार्यशाळेचे पुर्ण नियोजन, त्यांची अंमलबजावणी आणि संचलन ‘मैत्र कारवांच्या स्वयंसेवकांनी यशस्वीपणे केले स्वयंसेवकांसाठी आत्तापर्यंत घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग झाला याची पावतीच या कार्यशाळेत मिळाली.

युवा प्रशिक्षण : ‘जेंडर इक्वॅलिटी’

गुरुवार, दि.02/02/2017
वेळ – सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत
ठिकाण – मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निक, एकलहरे, नाशिक
प्रशिक्षक – 1) कल्याणी ए.एम. 2) किरण कांबळे 3) जयंत बोरीचा 4) अनिता पगारे 5) राजेश हिवरे 6) प्राजक्ता घोलप 7) शितल पवार 8) पूनम गायकवाड 9) शारदा देवकर 10) श्‍वेता पटेकर 11) रेहान शेख 12) संकेत सोनवणे 13) श्रद्धा कापडणे 14) रोशन बोराडे 15) अक्षय भामरे 16) शुभम वाघ 17) युवराज्ञी माणिक

सारस्वत को-ऑप. बँक लि., विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आसराबाई पॉलेटेक्निक कॉलेज, एकलहरे, नाशिक येथे ‘जेंडर इक्वॅलिटी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेत कॉलेजचे 300 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थांना खालीलप्रमाणे गटात विभागण्यात आले व संस्थेच्या समन्वयकांनी त्या त्या विषयाला धरून विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

1) सायबर क्राईम – या सत्रासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयकडून सायबर क्राईमचे वरीष्ट अधिकारी दिपक देसले सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय? कसा घडतो? आपण सोशल मिडिया वापरतांना अज्ञानापोटी कसे अडकतो? त्यावरील उपाय व कायदे त्यांनी समजून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांचे हे सत्र एकत्र घेण्यात आले.

2) दिल-दोस्ती-दुनियादारी – आकर्षण, मैत्री आणी प्रेम म्हणजे काय? यातला फरक काय आहे? तो कसा समजून घ्यावा व आमलात आणावा यावर गटात खूपच खेळीमेळीत चर्चा झाली. गटात सर्वच मुस्लिम होते. त्यांच्यात केला जाणारा मुलामुलींमधील भेद व त्यामुळे नात्यात जाणवत असलेला ताणतणाव विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला. त्यावर स्वयंसेवक शारदा देवकर, रेहान शेख यांनी मार्गदर्शन केले.

3) व्यसनधिनता आणि व्यसनाचे दुष्परिणाम – या गट चर्चेत मैत्र कारवाचे अक्षय भामरे, संकेत सोनवणे आणि किरण कांबळे यांनी व्यसन म्हणजे काय? त्यांचे प्रकार आणि त्याचा शरीरावर व मनावर होणारा परिणाम. कुटुंबावर व समाजावर होणारे दुष्परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी खूपच गंभीरपणे या चर्चेत सहभाग घेतला.

4) छेडछाड किंवा जितनी तेरी उतनी मेरी – या सदरात छेडछाड म्हणजे काय? त्याचे मुलींवर आणी मुलांवर होणारे परिणाम यावर खेळाच्या माध्यमातून चर्चा झाली. विद्यार्थ्यांना येणा-या आपल्या भागापासून ते कॉलेज आवारापर्यंत कुठे कुठे असुरक्षित वाटते किंवा शरीराच्या कुठल्या अवयवांना स्पर्श झाल्यास मुले मुली असुरक्षितता फिल करतात हे समजावून घेण्यासाठी प्रत्येक मुलामुलीस कार्डशिट देऊन लिहण्यास सांगितले आणि त्यातून असुरक्षित एरीया व अशा घटना ज्यात स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातो अशा घटनांची यादी तयार करण्यात आली. असे अयोग्य वर्तन कोणी केले तर काय काय उपाय करायचे यावर सविस्तर चर्चा झाली. या सत्रामुळे फक्त मुलीच नव्हे तर मुलांनाही चुकीच्या जागी स्पर्श केलेले आवडत नाही हे समजले. सदर सत्र श्रद्धा कापडणीस, रोशन आणी अनिकेत दराडे या स्वयंसेवकांनी घेतले.

5) जोडीदाराची निवड – ह्या सदरात स्वत;च्या लग्न प्रकि‘येत आपण स्वत कसे जास्तीत जास्त सहभागी होऊ शकतो, त्यामुळे काय फायदे होतात;. तसेच लग्न प्रक्रियेत मुलामुलींना सहभागी न केल्यामुळे कसे नुकसान होते. यावर चर्चा झाली. सदर सत्र पूनम गायकवाड, शीतल व अनिताने घेतले.

दुस-या सत्रात अनिताने लिंगभाव कसा निर्माण होतो. लिंगपद भावात विषमता समाजाकडून कशी कळत-नकळत घडविली जाते. यावर खेळाच्या माध्यमातून प्रकाश झोत टाकला. शेवटी विद्यार्थ्यांनी शिबिरासंबंधीच्या प्रतिक्रिया दिल्या व समारोप करण्यात आला.

आम्हाला अनुसरण करा

संपर्क कार्यालय

location-icon
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
fax-icon
०२५३ - २३०५६०५
time-icon
info@vishwasdynanprabodhini.com