संपर्क कार्यालय
निरज हाईट्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ (महाराष्ट्र)
शनिवार, दि. 16 सप्टेंबर 2017 ते रविवार, दि. 17 सप्टेंबर 2017
नाशिकच्या खवय्यांसाठी भजींचे वैशिष्टपूर्ण प्रकार असलेल्या अस्सल भजी महोत्सवाचे आयोजन शनिवार, रविवार दि. 16 व 17 सप्टेंबर रोजी विश्वास लॉन्स येथे करण्यात आले होते. ‘विश्वास संकल्प आनंदाचा’, ‘विश्वास ग्रुप’, ‘विश्वास हॅपीनेस सेंटर’ तर्फे सदर उत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूरयांची होती. विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत बँक, विश्वास लॉन्स यांचे भजी महोत्सवास सहकार्य लाभले.
भजी खाण्यासाठी अनेकजण ग्रृपने येत होते आणि चवीचा अनोखा आनंद घेत होते. महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत भजीचे इतके विविधअंगी आणि चवदार प्रकार असतात याचीच प्रचिती इथे खवय्ये घेत होते. अस्सल मसाले, भाजीपाल्याच्या सहाय्याने येणारी भजी चवीचा गोडवा वाढवणारी होती. भजी तयार करण्याच्या अभिनव पद्धती आणि त्यातील चवीचा अनोखा आनंद खवय्ये घेत होते. पालक भजी, मुंगदाळ भजी, चायनीज भजी, बेंगणी पकोडा, ब्रेड पकोडा, दम आलू पकोडा, जैन पकोडा, गिलका पकोडा, मेथी भजी, आलू चाप आणि त्यासोबत गरमा गरम जिलेबी असा बादशाही बेत विश्वास लॉन्सवर प्रत्येकजण अनुभव घेत होता. भजी तयार करण्याच्या अभिनव पद्धती आणि त्यातील चवीचा अनोखा आनंद खवय्ये घेत होते. पालक भजी, मुंगदाळ भजी, चायनीज भजी, बेंगणी पकोडा, ब्रेड पकोडा, दम आलू पकोडा, जैन पकोडा, गिलका पकोडा, मेथी भजी, आलू चाप आणि त्यासोबत गरमा गरम जिलेबी असा बादशाही बेत विश्वास लॉन्सवर प्रत्येकजण अनुभवत होते.
तसेच नाशिकमधील कलावंतांचा ‘जनस्थान-व्हॉट्स ऍप ग्रुप’ व म्युझिक क्लब ऑफ नाशिक यांच्यातर्फे अभय ओझरकर व हितेश कारिया यांच्या मार्गदर्शनाखाली गायकांसाठी अभिनव व्यासपीठ निर्माण करण्यात आले होते.
शनिवार, दि. 11 नोव्हेंबर 2017 ते रविवार, दि. 12 नोव्हेंबर 2017
नाशिकच्या खवय्यांसाठी बिर्याणी-पुलावचे वैशिष्टपूर्ण प्रकार असलेल्या अस्सल व्हेज बिर्यानी-पुलाव महोत्सवाचे आयोजन शनिवार, रविवार दि. 11 व 12 नोव्हेंबर रोजी विश्वास लॉन्स येथे करण्यात आले होते. ‘विश्वास संकल्प आनंदाचा’, ‘विश्वास ग्रुप’, ‘विश्वास हॅपीनेस सेंटर’ तर्फे सदर उत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत बँक, विश्वास लॉन्स यांचे या महोत्सवास सहकार्य लाभले.
खवय्यांसाठी पर्वणी ठरणा-या व्हेज बिर्याणी-पुलाव महोत्सवात व्हेज बिर्याणी-पुलावाच्या विविध चवदार प्रकारांची चव खवय्ये घेत होते. विश्र्वास ग्रुपतर्फे होत असलेल्या विविध खाद्य महोत्सवांमुळे पदार्थांचे वेगळेपण समोर येत आहे. या महोत्सवात विविध प्रकारची पावभाजी आणी मसाला राईस यांचा अनोखा मिलाफ महोत्सवात रंगात आणत होता.
या महोत्सवात गायकांसाठी अभिनव व्यासपीठ निर्माण करण्यात आले. या महोत्सवात व्हेज बिर्याणी-पुलाव बनविणारे अस्सल कूक
सहभागी झाले होते. महोत्सवास 25 हजार हून अधिक नाशिककर नागरिकांनी उपस्थिती लावली.
शनिवार, दि. 23 डिसेंबर 2017 ते सोमवार, दि.25 डिसेंबर 2017
सलग सुटयांचा आनंद लुटत चविष्ट खाद्यपदार्थ कमीतकमी किमतीत खरेदी करुन नाशिककर नागरिकांनी नॉनव्हेज महोत्सवास पसंती दिली. नाशिककर खवय्यांसाठी नॉनव्हेजचे वैशिष्टपूर्ण प्रकार असलेल्या अस्सल महोत्सवाचे आयोजन शनिवार ते सोमवार दि. 23 ते 25 डिसेंबर 2017 या कालावधीत विश्वास लॉन्स येथे करण्यात आले होते.
‘विश्वास संकल्प आनंदाचा’, ‘विश्वास ग्रुप’, ‘विश्वास हॅपीनेस सेंटर’ तर्फे सदर उत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत बँक, विश्वास लॉन्स यांचे या महोत्सवास सहकार्य लाभले.
महोत्सवानिमित्त विश्वास ग्रुपतर्फे उत्कृष्ट गायक/गायिका स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे संयोजन प्रसिद्ध गायक संजय गीते यांनी केले. या महोत्सवास अंदाजे 20 हजार नागरिकांनी भेट दिली.
नाशिकचा सर्वच क्षेत्रातील विकास झपाट्याने होत आहे. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच धार्मिक पवित्र जाणीवांना घेऊन नाशिक स्वत:ची ओळख जपत मेट्रो सिटीकडे वाटचाल करत आहे. विविध सांस्कृतिक, धार्मिक ऊत्सवांचे सातत्याने आयोजन हे शहराचे संचित आहे, परंपरा आहे. येथील खाद्यसंस्कृती चवदार व वैशिष्ठयपुर्ण आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्या समन्वयातून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प ‘विश्वास ग्रुप’ मार्फत करण्यात आला.
‘विश्वास संकल्प आनंदाचा’ या उपक्रमाचा संकल्पना सर्वप्रथम विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा.विश्वास ठाकूर यांनी मांडली. नविन वर्षाला सहकुटूंब सामोरे जातांना नवे संकल्प, नवी मैत्री, नवी ओळख व आनंदाची जाणीव प्रत्येक नाशिककर नागरिकाच्या मनात रुजावी ही यामागची भावना होती.
श्री.विश्वास जयदेव ठाकूर यांचेसोबत श्री.विनायक रानडे, मनेष बुरड, विवेकराज ठाकूर, स्वप्निल राका यांनी ह्या सकंल्पनेला मुर्त रुप द्यावे असे ठरविले व विश्वास को-ऑप बँकेच्या सहकार्याने नाशिककरांना आनंद देण्यासाठी विविध महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना मांडली आणि नववर्षाच्या पुर्वसंध्येला दि.31 डिसेंबर 2015 रोजी संगितकार डॉ.सलील कुलकर्णी व कवी संदिप खरेंची ‘आयुष्यावर बोलू काही’ ही रसिकप्रिय मैफिल आयोजित करुन ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ या उपक्रमास सुरुवात झाली.
विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक तर्फे नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख, आनंदाची जाणीव असलेला ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ या अनोख्या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी व कवी, गीतकार संदीप खरे यांची रसिकप्रिय मैफल ‘आयुष्यावर बोलू काही’ यानिमित्ताने सादर करण्यात आली. शब्द, सूर व गप्पा यांची सांगड असलेला हा कार्यक्रम रसिकांना निश्चितच भावला. गुरुवार, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10.30 या वेळात विश्वास लॉन्स, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422 013 येथे संपन्न झाला. विश्वास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाची संकल्पना विनायक रानडे यांची होती. सूत्रधार कैलास पाटील व सचिन शिंदे आहेत.या कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, मिलींद जहागिरदार, संजय गोंदेकर, उदय चांदोरकर, अविनाश दातार, विजय संकलेचा आणि डॉ. मनोज चोपडा यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास नाशिककर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक‘मांतर्गत विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. झणझणीत चटकदार मिसळीचे अनेक प्रकार त्यांच्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध करून देण्यात आले होते. मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या. काळ्या मसाल्याची, तर्रीदार, विविधरंगी रस्से, कोल्हापुरी झणझणीत मिसळ, कांदा-लसूण विरहित जैन मिसळ, उपवासाची मिसळ अशी विविधता एकाच ठिकाणी चाखण्याची संधी नाशिककरांना मिळाली. या निमित्ताने चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील अनेक चित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. त्याचाही आस्वाद उपस्थितांनी घेतला. सावरकर नगरमधील विश्वास लॉन्स येथे झालेल्या या मिसळ उत्सवात तुषार, कमला-विजय, भामरे, नानाज् कॅफे, जय गजानन, समृद्धी, साधना, सप्तशृंगी, करी लीव्हज्, एस.आर.केटरर्स, भगवती, बाळासाहेब अशा नामांकित मिसळींचे संमेलन भरले होते. मित्रमंडळी व कुटुंबियांसमवेत अनेकांनी उत्सवाला हजेरी लावली. नाशिकच्या खाद्य संस्कृतीला नवा आयाम ‘मिसळ-सरमिसळने दिला. मिसळीबरोबरच जिलेबीचा आस्वाद घेत तृप्तीची अनुभूती अनेकांनी घेतली. मिसळ-जिलबी खाल्ल्यानंतर लोकप्रिय चहाने रंगत वाढवली. वेगवेगळ्या प्रकारचे चहा उपलब्ध होते. मसालेदार चहा, स्पेशल चहा, ब्लॅक टी, आईस टी, पहाडी चाय असे एकसे एक चाय मौजूद होते.
विश्वास संकल्प आनंदाचा’ या उपक्रमांतर्गत नाशिककर खवय्यांसाठी चटकदार चवदार पदार्थांची चंगळ असलेल्या ‘नाशिक चौपाटी’ या अभिनव खाद्यउत्सवाचे आयोजन विश्वास लॉन्स येथे करण्यात आले होते. यात नाशिकच्या चवदार व लोकप्रिय 150 हून अधिक पदार्थांचा एकाच ठिकाणी आस्वाद घेण्याची संधी मिळाली. यात सुमारे 30 ते 35 हजाराहून अधिक खवय्यांनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. नाशिकच्या खाद्य संस्कृतीचे असलेले वेगळेपण आणि अस्सलपणा या निमित्ताने समोर आले. अशा एकाहून एक सरस व चवीचे वैविध्य असलेल्या पदार्थांनी नाशिक चौपाटीत चांगलाच आनंद लुटला. शुक्रवार, दि. 6 मे ते रविवार, दि. 8 मे 2016 या कालावधीत सदर उत्सव संपन्न झाला. विश्वास को ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. विश्वास जयदेव ठाकूर यांची या उपक्रमाची संकल्पना होती. विश्वास को ऑप बँक लि., नाशिक संकलेचा कन्स्ट्रक्शन, बागड असोसिएटस्, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपन्न झाला. आतिथ्यचा टेस्टी दहिवडा, पालक चाट, बटाटे वडा, नंदन स्विटस्चे चाट प्रकार, विजूजची चवदार दाबेली, सॅण्डवीच, कुलकर्णीजची चमचमीत पावभाजी, सराफ बाजारातील दराडे मामांचा मसाले वडा, गंगेवरील दरोडेंचे टिपीकल पॉट आईक्रीम, हेरंब फुडस्चे अफलातून खरवस, पियुष करी लिव्हजचा स्पेशल केशर तवा पुलाव, एस.आर. केटरर्सचा कोरीएन्टर चाट, मसाला डोसा, ढोकळा चाट, मुंगभजी, चना चटपटा, अशा चटकदार, बहारदार, चवदार पदार्थांचा समावेश होता. उन्हाळ्याचे दिवस व रणरणते ऊन असल्याने गोळा, पॉट आईस्क्रीम, सरबते, सोलकढी या स्टॉलवर खवय्यांनी गर्दी केली होती. फ्राईड आईसक्रीम नावाचा अफलातून प्रकार एस.आर. केटरर्स यांनी ठेवला होता. त्यालाही खवय्यांनी चांगला प्रतिसाद दिला. चाय टपरी, कॉफी क्लब, कोल्ड कॉफी, स्ट्रॉबेरी कॉफी सारख्या चहा कॉफीचा अस्सल स्वाद असलेल्या स्टॉलवर शौकिनांनी गर्दी केली होती.
नाशिक चौपाटीत आणखी विशेष आकर्षण होते कॅलिग्राफी प्रात्याक्षिकाचे चिंतामण पगार, निलेश गायधनी यांनी कॅलिग्राफीच्या विविध प्रकारची प्रदर्शन मांडले होते. ते प्रदर्शनास भेट देणाऱ्या व्यक्तीचे नांव कागदावर काढून भेट देत होते. अक्षरांचा स्वभाव अक्षरांची लयबद्धता हे प्रदर्शनात बघायला मिळाले. ‘संगीत सितारे’ या इन्स्ट्रूमेंन्टल ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. तेथे भेट देणार्याला सुरांची भेट मिळत होती.
श्री.विश्वास जयदेव ठाकूर यांचेसोबत श्री.विनायक रानडे, मनेष बुरड, विवेकराज ठाकूर, स्वप्निल राका यांनी ह्या सकंल्पनेला मुर्त रुप द्यावे असे ठरविले व विश्वास को-ऑप बँकेच्या सहकार्याने नाशिककरांना आनंद देण्यासाठी विविध महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना मांडली आणि नववषार्र्च्या पुर्वसंध्येला दि.31 डिसेंबर 2015 रोजी संगितकार डॉ.सलील कुलकर्णी व कवी संदिप खरेंची ‘आयुष्यावर बोलू काही’ ही रसिकप्रिय मैफिल आयोजित करुन ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ या उपक्रमास सुरुवात झाली. पुढे ‘मिसळ… सरमिसळ’, ‘नाशिक चौपाटी’ अश्या खाद्यमहोत्सवांनी नाशिककरांना अक्षरश: वेड लावले. या उपक्रमांना भरभरुन गर्दी व्हायला लागली. घरातील कुटूंबप्रमुख, जेष्ठ, महिला व मुले, मित्र या आनंदसोहळ्यात एकत्रितरित्या सामिल होऊ लागले. अशा या आनंदाच्या सोहळ्याच्या आयोजनात पुढे अनेक संस्था, व्यक्ती यांनी सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले. त्यात विशेष करुन विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, सारस्वत को-ऑप बँक.,मुंबई, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, संकलेचा कंस्ट्रकशन नाशिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास लॉन्स अशा संस्था व विनायक रानडे, मनेष बुरड, स्वप्निल राका, विवेकराज ठाकूर या व अशा असंख्य व्यक्तिंनी सहकार्य दिले. श्रावण महिना उपवास व व्रतवैकल्यांचा असतो. ह्या महिन्यात अनेक भाविक उपक्रमात करीत असतात. नाशिक परिसरात पंचवटी, त्रंबकेश्वर हे धर्मिक स्थळ असून नाशिक व परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. तसेच श्रावणी शनिवार व सोमवार सोमेश्वरला व चतुर्थीला नवशागणपतीला होणारी गर्दी हेरुन व श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमांतर्गत विश्वास ग्रुप तर्फे नाशिककर खवय्यांसाठी उपवासाच्या 100 हुन अधिक चटकदार व चवदार पदार्थांची चंगळ असलेला ‘नाशिक फास्ट’ हा अभिनव खाद्यउत्सव करण्याचे ठरले.
श्रावण महिन्यात दि.20 ऑगस्ट 2016 – श्रावणी शनिवार, रविवार 21 ऑगस्ट 2016 – संकष्टी चतुर्थी व दि.22 ऑगस्ट 2016 – तिसरा श्रावणी सोमवार ह्या उपवासाच्या तीन दिवसांचा अपूर्व योग साधून आल्याने या तीन दिवशीच नाशिक फास्ट महोत्सव करण्याचे ठरले. या महोत्सवात फक्त उपवासाचे पदार्थ उपलब्ध करुन देणारे एकूण 17 स्टॉलधारक सहभागी झाले. या स्टॉलद्वारे नाशिककरांसाठी 100 पेक्षा अधिक उपवासाचे चवदार व रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. नाशिक फास्ट महोत्सवाच्या’ ठिकाणी नादमधुर संगीत वाजविण्यात आले. तसेच महोत्सवात आलेल्या खाद्यप्रेमींनी लकी ड्रॉ करीता नाव व मोबाईलनंबरसह भरुन दिलेले कूपन्स दर एक तासानंतर जमा करुन उपस्थित असलेल्यांपैकी लकी ड्रॉ काढण्यात आला. ‘रोड ऑण्ड रॅप्स’ व ‘दिप अप्लायन्सेस’ यांनी प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. पहिल्या दिवशी श्री. चिंतामण पि.के., डॉ. शैलेंद्र पाटील, महेश कुलकर्णी, द्वारका मोरे, उमेश गिरी, समिर पाठक, केदार कुलकर्णी हे खाद्यप्रेमी लकी ड्रॉचे विजेते ठरले. त्यांना महोत्सवास उपस्थित मान्यवराच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. नाशिक फास्ट’ या उपवास महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाशिक व परिसरातील कुटूंबप्रमुख, महिला व मुले, घरातील जेष्ठ व मित्रमंडळी असे सर्व एकत्र येत अंदाजे तीन हजाराहून अधिक खवय्यांनी हजेरी लावली..पहिलाच दिवस असल्याने पदार्थांच्या टेस्टींगवर खवय्यांचा भर होता. महोत्सवात विविध स्टॉलधारकांनी उपलब्ध करुन दिलेले राजस्थानी साबुदाणा वडा, स्पेशल स्पायसी खिचडी, पुरी भाजी, पपई पॅटीस, केळी कचोरी, साबुदाणा मांचुरिअन, प्लेन डोसा, मसाला डोसा, पकोडा, पनीर डिश, भगर-आमटी, बनाना कटलेट, रताळे हलवा, पपया हलवा, केळी वेफर्स, मिसळ, मिल्क शेकस, लेमन टी कोल्ड, मोसंबी ज्युस, अनार ज्युस, चॉकलेट शेक या पदार्थांना खवय्यांकडून विशेषकरून जास्त मागणी होती. ‘नाशिक फास्ट’ महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे वैशिष्ठ्य म्हणजे पडसाद कर्णबधीर विद्यालय, सिडको यांनी या महोत्सवात विद्यालयातर्फे विविध उपवासाच्या पदार्थांचा विक्री स्टॉल लावला होता. या स्टॉलला भेट देण्यासाठी विद्यालयाचे विद्यार्थी महोत्सवात आले. महोत्सवाच्या आयोजकांमार्फत या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी विविध स्टॉलवर भेट देऊन उपवासाच्या पदार्थांची चव चाखून बालमनानेआनंद व्यक्त केला. या खाद्यमहोत्सवानिमित्त कुसूमाग्रज प्रतिष्ठान- बालग्रंथालयातर्फे ‘मैत्री अक्षरांशी’ हि हस्ताक्षर सुधारण्यासाठीची कार्यशाळा झाली. महोत्सवाच्या शेजारीच असलेल्या विश्वास हब येथे मुंबईचे विरेन देढीया यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला 100 हुन अधिक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. हस्ताक्षरासोबतच बेसिक बिहेव्हीअर थेरपी, हस्ताक्षराचे वळण, वेग, आकार यावर लक्ष देण्याचे विरेन देढीया यांनी सांगितले. संकंष्टी चतुर्थीच्या निमित्ताने महोत्सवात विश्वास लॉन्स येथे सामुहिक श्री गणपती अथर्वशिर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले. यात उपवासधारकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.घेतला. नाशिक फास्ट महोत्सवात’ पुरी भाजी तिही उपवासाची, खजुराचा लाडू, आळीवाचा लाडू, भाकरी ठेचा, धनियाचा टिक्का, शाही रताळा, ज्युसेस, कुल्फी, कटलेट, केशर व इराणी चहा अशा चवींचे वेगळेपण असलेले 100 हुन अधिक पदार्थांवर खाद्य रसिकांनी ताव मारला. या खाद्य महोत्सवाला तिस-या दिवशीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला. श्रावणी सोमवारच्या औचित्य साधून 5000 हून अधिक खवय्यांनी खाद्यमहोत्सवास भेट दिली. महोत्सवात उपवासाचे फिंगरचिप्स, उपवासाची मिसळ, उपवासाची जिलेबी अशा नाविन्यपुर्ण पदार्थांनी रंगत आणली. सकाळपासूनच या पदार्थांच्या खरेदीसाठी रांगा दिसत होत्या. महोत्सवात मिठाईपासून फळांपर्यंत अनेक पदार्थ होते. महोत्सवात विविध फळांचे वेफर्स व फळांनाही मागणी होती.
“नाशिक फास्ट” महोत्सवात 18000 वर खवय्यांनी उपस्थिती लावून उपवासाच्या पदार्थांची चव चाखली. उपवासाच्या 100 हून अधिक पदार्थांनी या निमित्ताने नाशिकच्या खाद्यसंस्कृतीत वेगळेपणाची मोहर उमटविली. उपवसासारख्या परंपरेचा उपयोग हा कुटूंबासह, मित्रांसमवेत एकत्र येऊन साजरा करता येऊ शकतो हे या महोत्सवाने दाखविले.
‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमांतर्गत विश्वास को-ऑप बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, सारस्वत को-ऑप बँक लि., महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ, रेडिओ विश्वास 90.8, मे.अथर्व एंटरप्रायजेस, मे.किंगस्टार इलेक्ट्रॉनिक्स, मे.वैष्णवी अॅग्रो फिडस, मे.वेल्थझोन रिअलटर्स, मे.संकलेचा कन्स्ट्रक्शनतर्फे मा.विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून शनिवार दि. 20 ऑगस्ट 2016 पासून तीन दिवस रोज सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत नाशिक फास्ट हा खाद्यमहोत्सव विश्वास लॉन्स गंगापुर रोड येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.
नाशिक महानगराची वेगाने होणारी वाढ आणी त्याचबरोबर खाद्यसंस्कृतीत होणारे बदल याचेच दर्शन ‘नाशिक फास्ट’ मध्ये घडले. उपवासाचे पदार्थ बनविण्याची पद्धत आणी त्यासाठी लागणारे पदार्थ याविषयी स्टॉलधारक हे खाद्यप्रेमींना सखोल माहिती देत होते. त्याचबरोबर खवय्यांशी मनमोकळेपणाने संवादही साधत होते.
‘नाशिक फास्ट’ महोत्सवाकरिता आधुनिक मिडीयाचा वापर करण्यात आला. रेडिओ विश्वास 90.8 या इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे दर तासाला माहिती प्रसारित करण्यात आली. तसेच व्हॅटसअप, फेसबुक, ई-मेल सारख्या सोशल मिडीयाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत महोत्सव नेण्यात आयोजक यशस्वी झाले. नाशिक मधील वृत्तपत्रांनी महोत्सवपूर्व व महोत्सव चालू असतांनाचे वृत्तांकन करून आपल्या प्रसिद्ध दैनिकात बातम्या देऊन नाशिक मध्ये होत असलेल्या या नाविन्यपूर्ण महोत्सवांची विशेष दखल घेतली.
पडसाद कर्णबधीर विद्यालयाच्या स्टॉलवरील भाकरी, ठेचा, भेंडी भाजी, शिंगाडा चिवडा एस.आर.केटरर्स यांचे शाही रताळे सारख्या डिशेस या व अशा विविध पदार्थांनी या तीनदिवसीय महोत्सवात रंगत आणली. महोत्सवाच्या तीनही दिवशी दर एक तासाने लकी ड्रॉ ची सोडत काढण्यात आली. त्यातील विजेत्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले.
महोत्सवाचे संकल्पक श्री. विश्वास ठाकूर यांनी जनतेच्या प्रतिसादावरच अशा प्रकारचे उपक्रम यशस्वी होतात व त्यांचा सहभाग लाखमोलाचा असतो. भविष्यातही अशा प्रकारचे महोत्सव नाशिककरांसाठी आयोजित करण्यात येतील अशी प्रतिक्रया दिली.
‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमांतर्गत सारस्वत को-ऑप. बँक विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ऑण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास लॉन्स, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून शुक्रवार, दि.09 डिसेंबर ते रविवार, दि.11 डिसेंबर 2016 या कालावधीत नॉनव्हेज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मिसळ…सरमिसळ…, नाशिक चैापाटी व नाशिक फास्ट ह्या मागील संपन्न झालेल्या उपक्रमाचा अनुभव जमेस धरता यावेळेस नॉनव्हेज महोत्सवाचे नियोजन करण्यात आले. विश्वास लॉन्स येथे एकून 21 स्टॉल बांधण्यात आले. व बसण्यासाठी लॉन्सच्या मध्यवर्ती जागेत टेबल्स व खुर्च्या मांडण्यात आल्या. थंडीचे दिवस असल्याने शेकोटीची व्यवस्था करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनकरीता संस्थेच्या अनेक स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महोत्सवाकरीता जागा ठरवितांना नाशिकमधील प्रसिद्ध तसेच विशाल परिसर असलेल्या विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, गंगापुर रोड, नाशिक या ठिकाणाची निवड करण्यात आली. महोत्सवाची वेळ ठरवितांना पहिल्या दिवशी दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यत व पुढील दोन दिवस सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ ठरविण्यात आली.
या महोत्सवात नॉनव्हेज पदार्थांचे एकूण 14 स्टॉलधारक सहभागी झाले. व व्हेज पदार्थांचे 7 सहभागी झाले. या स्टॉलद्वारे नाशिककरांसाठी चमचमीत नॉनव्हेज खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे वैशिष्ठ्य म्हणजे नॉनव्हेज स्टॉलबरोबरच क्र. 15 ते 21 हे शाकाहारी स्टॉल महोत्सवात लागलेले होते. एकाच कुटूंबातील व्हेज व नॉन व्हेज खाणा-या दोन्ही प्रकारच्या खवय्यांना एकाहून अधिक सरस पदार्थ येथे उपल्बध होते. त्यामुळे कुटूंबातील ज्या सदस्याला नॉनव्हेज चालत नाही त्यांना व्हेज पदार्थ उपलब्ध होते. त्यामुळे कुट्ंबातील कोणत्याही सदस्याची येथे अडचण झाली नाही. नॉनव्हेज पदार्थातील चटकदारपणा आणि ते बनवण्याच्या पध्दतीतील वेगळेपणाचा आनंद नॉनव्हेज महोत्सवात खवय्यांनी अनुभवला. नॉनव्हेज पदार्थांची एक स्वतंत्र खाद्य संस्कृती आहे आणि त्यातील अनोखा मेळ महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अजूनही टिकून आहे, त्याची प्रचिती महोत्सवात आली. नॉनव्हेज पदार्थातील चटकदारपणा व खास तयार केलेल्या मसाल्यांचा वापर ही खासियत येथे अनुभवास आली. महोत्सवाच्या दुस-या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिध्द सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे यांनी महोत्सवास भेट दिली व नॉनव्हेज महोत्सवाच्या अभिनव आयोजनाबद्दल कौतुक उदगार काढले.
याप्रसंगी बोलतांना शेफ पराग कान्हेरे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती वैशिष्टपूर्ण असून दर 20 मैलावर पदार्थांची चव बदलत असते. स्वयंपाक हा मक्ता फक्त स्त्रियांवर न सोपवता सर्वांनीच पॅशन म्हणून स्वयंपाक बनविण्याकडे बघितले पाहिजे. या महोत्सवाप्रमाणेच प्रत्येक शहरात अशा प्रकारचे महोत्सव आयोजित केल्यास तेथील नागरिकांना नवनवीन खाद्यपदार्थांची ओळख होईल. पती-पत्नीने एकत्रितपणे स्वयंपाक केल्यास घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल’ असेही ते गंमतीने म्हणाले. नॉनव्हेज महोत्सवात’ खिमा मुघलाई, अफगाणी बैदा करी, दाल घोश, चिकन/ मटन बिर्याणी, अरोमा बिर्याणी, चिकन भूना फ्राय, मेथी पालक स्मोक, हैद्राबादी पध्दतीची हिरवी चिकन बिर्याणी, मटन चॉप, चुलीवरची नॉनव्हेज मिसळ, तांबडा व पांढरा रस्सा, ड्रायफ्राय चिकन-मटन, खर्डा चिकन, ब्लॅक चिकन, मटन लोणचे, मटन चॉप्स, अळणी मटन खिचडा अशा एकाहून अधिक सरस पदार्थांची चव घेतली.. नाशिककर खवय्यांनी अॅरोमा बिर्याणी, चिकन भूना फ्राय, मेथी पालक स्मोक, हैदराबादी पध्दतीची हिरवी चिकन बिर्याणी, मटन चॉप्स, चुलीवरची नॉनव्हेज मिसळ इ.एकाहून अधिक सरस पदार्थांची चव घेतली. महोत्सवादरम्यान ड्रोन या अत्याधुनिक सिस्टीमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
नॉनव्हेज महोत्सवाच्या तिनही दिवस मिळून 30000 वर नाशिककर खवय्यांनी उपस्थिती लावून नॉनव्हेज पदार्थांची लज्जत अनुभवली. या महोत्सवाने नाशिकच्या खाद्यसंस्कृतीत वेगळेपणाची मोहर उमटविली. या महोत्सवाचा उपयोग हा कुटूंब, मित्र यांना एकत्र करण्यासाठी होऊ शकतो हे या महोत्सवाने दाखविले.‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमांतर्गत विश्वास को-ऑप बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड् रिसर्च इन्स्टिट्युट, सारस्वत को-ऑप बँक लि., रेडिओ विश्वास 90.8, तर्फे मा.विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून शुक्रवार, दि.09 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2016 हे तीन दिवस रोज सकळी 8 ते रात्री 10 पर्यंत ‘नॉनव्हेज महोत्सव’ विश्वास लॉन्स गंगापुर रोड येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.
‘नॉनव्हेज महोत्सव’ मोठ्या उत्सहात पार पडल्यानंतर ‘मिसळ…सरमिसळ’ महोत्सवाचे आयोजन करतांना दि. 26 जानेवारी प्रजाकसत्तादिनाची सुट्टी, दि.28 शनिवार हाफ डे व दि.29 रविवारची सुट्टी असा योग जुळून आला. विश्वास लॉन्स येथे नाशिक बरोबरच इतर शहरांमधील नावाजलेले मिसळ व्यावसायिक या महोत्सवात एका ठिकाणी एकत्र आले. नाशिक शहरातील व इतर शहरातील विविध मिसळ मालक /हॉटेल यांच्याशी संपर्क साधून या महोत्सवाची पूर्व कल्पना देऊन महोत्सवात सहभागी होण्याचा आग्रह धरला.
गुरुवार, दि. 26/01/2017 ते रविवार दि. 29/01/2017
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, सारस्वत बँक, विश्वास लॉन्स यांचे संयुक्त विद्यमाने मिसळ-सरमिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारच्या 25 हून अधिक मिसळींचा अस्सलपणा आणि नाविन्यपूर्ण चवींचा आस्वाद घेत ‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सवात 30 हजाराहून अधिक खवय्यांनी खर्या अर्थाने मिसळींचा आस्वाद घेतला. महाराष्ट्राच्या खाद्यापरंपरेत मिसळ हा कसा जीवनशैलीचा भाग झाला आहे याची प्रचिती यात प्रत्येकाने घेतली. नाशिकच्या वेगाने विकसित होण्यार्या ‘मेट्रो सिटीत’ ‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सवाला इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसामान्यांचा प्रतिसाद मिळणे हा खाद्यासंस्कृतिचा विकासाचाच एक भाग म्हणावा लागेल. मिसळच्या तर्हेतर्हेच्या प्रकारांतून चवीचा विलक्षण आनंद घेत खवय्ये मिसळ सरमिसळ महोत्सवाचा आनंद लूटत होते. कॉलेजचे युवक-युवती तसंच कुटुंबियांसह अनेकजण मिसळींचा आस्वाद लुटण्यासाठी आले होते. निखारा दम मिसळमधला झणझणीतपणा, गोविंदा मिसळीसोबतची जिलेबी, यशवंत टी चे मिसळीसोबत पेढे, गोडशेव, चाय टपरीचा चहा, उकडीचे मोदक, भरोसाची कुल्फी यासारख्या पदार्थांनी महोत्सवात जोरदार रंगत आणली आहे. सप्तश्रृंगी मिसळ, माऊली मिसळ, गजानन मिसळ, विविध प्रकारचे चॉकलेटस् यातून सर्वांचीच चंगळ होत होती. नाशिकच्या खवय्यांसाठी मिसळचे वैशिष्टपूर्ण प्रकार असलेल्या अस्सल मिसळचा ‘मिसळ-सरमिसळ’ उत्सवाचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. ‘विश्वास संकल्प आनंदाचा’, ‘विश्वास ग्रुप’, ‘विश्वास हॅपीनेस सेंटर’ तर्फे सदर उत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. राहूल भावे यांचे श्री.पद्मावती केटरर्स, झेलम मसाले हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स असून ब्रव्हरेज पार्टनर अॅरोमा वॉटर होते. ‘मिसळ-सरमिसळ’ महोत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजक विश्वास ठाकूर, विनायक रानडे, मनेष बुरड, स्वप्निल राका, समीर देशपांडे, विवेकराज ठाकूर, मंदार ठाकूर यांनी प्रयत्न केले.
मिसळ महोत्सवाच्या चारही दिवस मिळून 30000 वर नाशिककर खवय्यांनी उपस्थिती लावून विविध प्रकार्च्या मिसळींची लज्जत अनुभवली. या महोत्सवाने नाशिकच्या खाद्यसंस्कृतीत वेगळेपणाची मोहर उमटविली.या महोत्सवाचा उपयोग हा कुटूंब, मित्र यांना एकत्र करण्यासाठी होऊ शकतो हे या महोत्सवाने दाखविले. ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमांतर्गत विश्वास को-ऑप बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड् रिसर्च इन्स्टिट्युट, सारस्वत को-ऑप बँक लि., रेडिओ विश्वास 90.8, तर्फे मा.विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून दिनांक 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2017 दिवस रोज सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मिसळ महोत्सव विश्वास लॉन्स गंगापूर रोड येथे यशस्विरित्या संपन्न झाला.
नाशिक महानगराची वेगाने होणीर वाढ आणि त्याचबरोबर खाद्यसंस्कृतीत होणारे बदल याचेच दर्शन मिसळ महोत्सवा मध्ये घडले. मिसळ बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे पदार्थ/मसाले याविषयी स्टॉलधारक हे खाद्यप्रेमीना सखोल माहिती देत होते. त्याचबरोबर खवयांशी मनमोकळेपणाने संवादही साधत होते. मिसळ महोत्सवाच्या जाहिरातीकरिता आधुनिक मिडियाचा वापर करण्यात आला. रेडिओ विश्वास 90.8 या इलेक्ट्रिक मिडियाद्वारे दर तासाला माहिती प्रसारित करण्यात आली. तसेच व्हॅाट्स अॅप, फेसबुक, इ मेल सारख्या सोशल मिडियाचा वापर करुन जास्तित जास्त लोकापर्यंत महोत्सव नेण्यात आयोजक यशस्वी झाले. नाशिक मधील वृत्तपत्रांनी महोत्सवपूर्व व महोत्सव चालू असतांनाचे वृतांकन करुन आपल्या प्रसिद्ध दैनिकांत बातम्या देउन नाशिक मध्ये होत असलेल्या या नाविन्यपुर्ण महोत्सवाची विशेष दखल घेतली. इाल मिसळ, हिरव्या मुगाची मिसळ, दम निखारा मिसळ, कचोरी, जलेबी एकाहून अधिक सरस पदार्थांनी या चार दिवसीय महोत्सवात रंगत आणली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दर एक तासाने लकी ड्रो ची सोडत काढण्यात आली. त्यातील विजेत्यांना बक्षिस टकले ज्वेलर्स यांचे सहकार्याने भेटवस्तु देउन गौरवण्यात आले. महोत्सवाचे संकल्पक श्री विश्वास ठाकूर यांनी जनतेच्या प्रतिसादावरच अशा प्रकारचे उपक्रम यशस्वी होतात व त्यांचा सहभाग लाखमोलाचा असतो. भविष्यातही अशा प्रकारचे महोत्सव नाशिककरांसाठी आयोजीत करण्यात येतील अशी प्रक्रिया दिली.